रामतीर्थ न्यूज
newspaper ई-पेपर
search

भीमाशंकर परिसरातील वृक्षतोड तत्काळ थांबवा; आजऱ्यात वृक्षप्रेमी समूहाचे तहसीलदारांना निवेदन

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

भीमाशंकर परिसरातील वृक्षतोड तत्काळ थांबवा; आजऱ्यात वृक्षप्रेमी समूहाचे तहसीलदारांना निवेदन
“

'वृक्षप्रेमी समूह व पर्यावरणप्रेमी आजरा'

आजरा: प्रतिनिधी,

भीमाशंकर अभयारण्याच्या लगतच्या वनक्षेत्रात 'टोरंट' कंपनीकडून सुरू असलेली वृक्षतोड तत्काळ थांबवून पर्यावरणाचा ऱ्हास रोखावा, या मागणीसाठी 'वृक्षप्रेमी समूह व पर्यावरणप्रेमी आजरा' यांच्या वतीने आजरा तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

​सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, टोरंट कंपनीने सुमारे ६०० एकर परिसरात वृक्षतोड सुरू केली असून ३,२४,९० वृक्षांच्या तोडीस परवानगी दिल्याचे सकृत दर्शनी समजते. ही वृक्षतोड झाल्यास परिसरातील वन्यजीव, दुर्मीळ वनस्पती व प्रजाती नामशेष होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. जंगल ही मानवी समाजाची फुप्फुसे असून मानवनिर्मित वृक्षलागवडीने मूळ नैसर्गिक जंगलाची भरपाई होऊ शकत नाही. त्यामुळे भीमाशंकर अभयारण्य परिसरातील ही वृक्षतोड त्वरित थांबवण्यात यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

​याशिवाय, सह्याद्रीच्या (पश्चिम घाट) पट्ट्यात भविष्यात पर्यावरणास हानी पोहोचवणारा कोणताही प्रकल्प आणू नये, माधव गाडगीळ व अन्य तज्ज्ञांच्या अहवालांचा गांभीर्याने विचार करून पर्यावरणपूरक मार्गदर्शिका (रोडमॅप) जाहीर करण्यात यावी तसेच आतापर्यंत तोडलेल्या वृक्षांची हानी भरून काढण्यासाठी संबंधित कंपनीवरच वृक्षारोपण व संवर्धनाची जबाबदारी सोपवावी, अशा मागण्याही या वेळी मांडण्यात आल्या.

​हे निवेदन सादर करताना पुष्पलता घोळसे, डॉ. गौरी भोसले, प्रा. मीना मंगळूकर, दशरथ सोनुले, सुनील पाटील, रणजित कालेकर, कृष्णा सावंत, संजय घाटगे, विलास पोवार, विकास पाटील, विशाल जाधव आदी वृक्षप्रेमी उपस्थित होते.


संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

आजरा साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२५-२६ चे रू.१००/- प्रमाणे अंतीम ऊस बील जमा.
महाराष्ट्र

आजरा साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२५-२६ चे रू.१००/- प्रमाणे अंतीम ऊस बील जमा.

शासकीय जिल्हास्तर नेटबॉल स्पर्धेत आजरा महाविद्यालयाच्या मुलींचे यश.
क्रीडा

शासकीय जिल्हास्तर नेटबॉल स्पर्धेत आजरा महाविद्यालयाच्या मुलींचे यश.

केंद्रीय प्राथमिक शाळा गवसे येथे वॉटर प्युरिफायरचे लोकार्पण.
सामाजिक

केंद्रीय प्राथमिक शाळा गवसे येथे वॉटर प्युरिफायरचे लोकार्पण.

पैशांचे पाकीट परत करून शाळकरी विद्यार्थ्यांनी जपला प्रामाणिकपणा; आजऱ्यात संदेश आणि नैतिकचे कौतुक
सामाजिक

पैशांचे पाकीट परत करून शाळकरी विद्यार्थ्यांनी जपला प्रामाणिकपणा; आजऱ्यात संदेश आणि नैतिकचे कौतुक

ANCHOR AD SLOT