आजरा: प्रतिनिधी,
मिणचे (ता. हातकणंगले) येथे नुकत्याच पार पडलेल्या शासकीय जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत आजरा महाविद्यालयाच्या ज्युनिअर विभागातील मुलींच्या संघाने चमकदार कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला.
या यशस्वी संघामध्ये मानसी पोटे, आर्या हेबाळकर, हर्षदा पाटील, रसिका सुतार, विजयालक्ष्मी पाटील, श्रुती पंडित, स्वाती हसबे, साक्षी कांबळे, प्रांजली पाटील, भक्ती सुतार, राही पाटील व आर्या जाधव या खेळाडूंचा समावेश होता. या विद्यार्थिनींनी स्पर्धेत उत्तम खेळाचे प्रदर्शन करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.
या सर्व यशस्वी खेळाडूंना जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकअण्णा चराटी, उपाध्यक्ष मा. विलास नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण पोतदार, उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक प्रा. मनोजकुमार पाटील तसेच कार्यालयीन अधीक्षक श्री योगेश पाटील यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले.
तसेच खेळाडूंना क्रीडाशिक्षक प्रा. अल्बर्ट फर्नांडिस आणि शारीरिक शिक्षण संचालक डॉ. धनंजय पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे क्रीडाप्रेमी व परिसरातून कौतुक होत आहे.