रामतीर्थ न्यूज
newspaper ई-पेपर
search

'संघे शक्तिः कलौ युगे'; राष्ट्रोत्थानासाठी हिंदू समाजाने संघटित व्हावे – प्रमोद मिराशी

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

'संघे शक्तिः कलौ युगे'; राष्ट्रोत्थानासाठी हिंदू समाजाने संघटित व्हावे – प्रमोद मिराशी
“

आजऱ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिमाखदार सघोष पथसंचलन

आजरा, दि. २४ (प्रतिनिधी) :

"कलियुगात संघटित समाज हीच खरी शक्ती असून, राष्ट्राच्या सर्वांगीण उत्थानासाठी हिंदू समाजाने संघटित राहून राष्ट्रकार्यात सक्रिय योगदान दिले पाहिजे," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर विभाग बौद्धिक प्रमुख प्रमोद मिराशी यांनी केले.

​राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आजरा शहराच्या वतीने आयोजित विजयादशमी सघोष पथसंचलन व शस्त्रपूजन उत्सवात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आजरा महाविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. अशोक बाचुळकर उपस्थित होते.

​आपल्या बौद्धिकात मिराशी यांनी भारताच्या प्राचीन वैभवापासून ते आधुनिक भारताच्या वाटचालीचा आढावा घेतला. भारतीय समाजाने विविध कालखंडांत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या विजयांचे ऐतिहासिक दाखले देत त्यांनी 'संघे शक्तिः कलौ युगे' या सुभाषिताचा आशय स्पष्ट केला. संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी सेवा, शिक्षण, ग्रामविकास आणि सामाजिक समरसता या क्षेत्रांतील संघकार्याचा पट मांडला. तसेच शताब्दी वर्षानिमित्त राबवली जाणारी पंचपरिवर्तन संकल्पना, समाजसंपर्क अभियान आणि सद्भावना बैठकांची माहिती दिली.

​प्रमुख अतिथी प्रा. डॉ. अशोक बाचुळकर यांनी, "संघाचे कार्य, विचार आणि त्यामागील समर्पण प्रत्यक्ष संपर्कात आल्याशिवाय समजून घेणे कठीण आहे," असे नमूद करत संघाच्या राष्ट्रसमर्पित भूमिकेचे कौतुक केले.

​शिस्तबद्ध पथसंचलनाने वेधले लक्ष

कार्यक्रमाच्या निमित्ताने आजरा शहरात आयोजित केलेले सघोष पथसंचलन लक्षवेधी ठरले. पूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध रांगा आणि घोषाच्या तालावर पडणारी एकसमान पावले यामुळे संघशिस्तीचे प्रभावी दर्शन घडले. संचलन मार्गावर शहरातील नागरिकांनी ठिकठिकाणी रांगोळ्या काढून व उत्स्फूर्त पुष्पवृष्टी करून पथसंचलनाचे स्वागत केले. संघटन, समरसता आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश देणाऱ्या या उत्सवाने आजरा शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

रोझरी इंग्लिश स्कूल, आजरा येथे हिरक महोत्सवाचा भव्य व दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न
देश

रोझरी इंग्लिश स्कूल, आजरा येथे हिरक महोत्सवाचा भव्य व दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न

डॉ. अनिल देशपांडे यांना राज्यस्तरीय 'आयएमए प्रेसिडेंट ॲप्रिसिएशन ॲवॉर्ड' जाहीर
देश

डॉ. अनिल देशपांडे यांना राज्यस्तरीय 'आयएमए प्रेसिडेंट ॲप्रिसिएशन ॲवॉर्ड' जाहीर

दुष्काळसदृश परिस्थितीत वन्यप्राण्यांसाठी पाण्याचा आधार; हरपवडे जंगलात वनराई बंधारा पूर्ण
महाराष्ट्र

दुष्काळसदृश परिस्थितीत वन्यप्राण्यांसाठी पाण्याचा आधार; हरपवडे जंगलात वनराई बंधारा पूर्ण

‘कै. श्री. सुभाष रामचंद्र चव्हाण स्मृती ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धा २०२६’ चा निकाल जाहीर
महाराष्ट्र

‘कै. श्री. सुभाष रामचंद्र चव्हाण स्मृती ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धा २०२६’ चा निकाल जाहीर

ANCHOR AD SLOT