रामतीर्थ न्यूज
newspaper ई-पेपर
search

पैशांचे पाकीट परत करून शाळकरी विद्यार्थ्यांनी जपला प्रामाणिकपणा; आजऱ्यात संदेश आणि नैतिकचे कौतुक

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

पैशांचे पाकीट परत करून शाळकरी विद्यार्थ्यांनी जपला प्रामाणिकपणा; आजऱ्यात संदेश आणि नैतिकचे कौतुक

आजरा:

रस्त्यावर सापडलेले रोख रकमेसह महत्त्वाचे दस्तऐवज असलेले पाकीट मूळ मालकाला परत मिळवून देत येथील पंडित दीनदयाळ विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणाचा नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या सचोटीबद्दल शाळेसह परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

​येथील पंडित दीनदयाळ विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये शिकणारे विद्यार्थी कु. संदेश कोरे व कु. नैतिक कांबळे हे नेहमीप्रमाणे शाळेत येत असताना सीड फार्माजवळ त्यांना एक पैशांचे पाकीट सापडले. पाकीट उघडून पाहिल्यानंतर त्यात पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे समजताच, कोणत्याही मोहाला बळी न पडता या दोघांनी ते पाकीट तातडीने शाळेतील शिक्षकांकडे आणून सुपूर्द केले.

​शिक्षकांनी पाकिटाची पाहणी केली असता ते पाकीट सौ. कृष्णाबाई तुकाराम धडाम यांचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये एसटी बस पास, आधार कार्ड आणि ₹२,२००/- रोख रक्कम होती. शाळेने तत्काळ संपर्क साधून कृष्णाबाई यांचे सुपुत्र सुनील धडाम यांना विद्यालयात बोलावून घेतले आणि सर्व ऐवजासह पाकीट त्यांच्या स्वाधीन केले.

​आपल्या आईचे हरवलेले पाकीट सुरक्षित परत मिळाल्याने सुनील धडाम यांनी समाधान व्यक्त करत संदेश कोरे व नैतिक कांबळे या दोन्ही विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक वृत्तीबद्दल त्यांना ₹५००/- चे रोख बक्षीस देऊन गौरवले. आजच्या युगात शिक्षणासोबतच संस्कार आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या दोन्ही विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि नागरिकांकडून विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

नवीनतम अद्यतन

व्यंकटराव हायस्कूलमध्ये 'वाचन प्रेरणा दिन' आणि 'जागतिक हात धुवा दिन' उत्साहात साजरा
महाराष्ट्र

व्यंकटराव हायस्कूलमध्ये 'वाचन प्रेरणा दिन' आणि 'जागतिक हात धुवा दिन' उत्साहात साजरा

रोझरी इंग्लिश स्कूल आजरा येथे ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा; समूह वाचनातून डॉ. कलाम यांना आदरांजली
शैक्षणिक

रोझरी इंग्लिश स्कूल आजरा येथे ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा; समूह वाचनातून डॉ. कलाम यांना आदरांजली

आजऱ्यात ‘उमेद महा दांडिया २०२६’ उत्साहात संपन्न; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र

आजऱ्यात ‘उमेद महा दांडिया २०२६’ उत्साहात संपन्न; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वाचनाच्या बळावर जग जिंकण्याची क्षमता निर्माण होते : प्रा. मनोजकुमार पाटील
महाराष्ट्र

वाचनाच्या बळावर जग जिंकण्याची क्षमता निर्माण होते : प्रा. मनोजकुमार पाटील

ANCHOR AD SLOT