रामतीर्थ न्यूज
newspaper ई-पेपर
search

आजरा साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२५-२६ चे रू.१००/- प्रमाणे अंतीम ऊस बील जमा.

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

आजरा साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२५-२६ चे रू.१००/- प्रमाणे अंतीम ऊस बील जमा.
“

प्रतिटन १०० रुपयांप्रमाणे अंतिम बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

आजरा: प्रतिनिधी,

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२५–२६ मध्ये गाळपास आलेल्या ऊसासाठी प्रतिटन १०० रुपयांप्रमाणे होणारी अंतिम हप्त्याची रक्कम ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेस संचालक मंडळाने दिलेल्या आश्वासनाचा विचार करून, नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेत कारखान्याचे अध्यक्ष यांनी जाहीर केल्यानुसार दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम जमा करण्यात आली आहे.

​गळीत हंगाम २०२५–२६ मधील ऊसाला एफ.आर.पी. (FRP) नुसार प्रतिटन ३,१९४ रुपये दर देय असताना कारखान्याने यापूर्वीच प्रतिटन ३,४०० रुपयांप्रमाणे ऊस बिल अदा केले होते. आता प्रतिटन १०० रुपयांप्रमाणे ३ कोटी ६ लाख ८८ हजार रुपयांची अंतिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. यामुळे गतवर्षीच्या ऊसाला एकूण प्रतिटन ३,५०० रुपये दर मिळाला असून, कारखान्याने एफ.आर.पी. पेक्षा प्रतिटन ३०५ रुपयांप्रमाणे एकूण ९ कोटी ३६ लाख रुपयांची ज्यादा रक्कम दिली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधून बिलाची रक्कम उचल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

​हंगाम २०२६–२७ साठी ४ लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट

आगामी २०२६–२७ च्या गळीत हंगामासाठी कारखान्याची यंत्रणा सक्षम ओव्हरहॉलिंग करून पूर्णपणे सज्ज झाली आहे. ऊस तोडणी व वाहतुकीसाठी परजिल्ह्यातील व स्थानिक अशी मिळून ३६४ यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. करार केलेला संपूर्ण ऊस वेळेत गाळप करण्याचे आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने वेळेत बिले अदा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

​तालुक्यासह लगतच्या गडहिंग्लज, चंदगड व आंबोली भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस आजरा कारखान्यास पाठवून ४ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री. मुकुंदराव देसाई यांनी केले.

​या प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. अनिल फडके, जिल्हा बँक प्रतिनिधी श्री. सुधीर देसाई, संचालक श्री. वसंतराव धुरे, श्री. विष्णू केसरकर, श्री. उदयसिंग पोवार, श्री. मधुकर देसाई, श्री. मारुती घोरपडे, श्री. सुभाष देसाई, श्री. दिपक देसाई, श्री. रणजित देसाई, श्री. संभाजी पाटील (हात्तीवडे), श्री. शिवाजी नांदवडेकर, श्री. राजेंद्र मुरुकटे, श्री. राजेश जोशीळकर, श्री. गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक श्री. काशिनाथ तेली, श्री. संभाजी दत्तात्रय पाटील, श्री. अशोक तर्डेकर, श्री. हरी कांबळे, तज्ञ संचालक श्री. नामदेव नार्वेकर, श्री. रशीद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी श्री. दिगंबर देसाई तसेच कार्यकारी संचालक श्री. एस. के. सावंत व इतर अधिकारी उपस्थित होते.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

व्यंकटराव हायस्कूलमध्ये शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
महाराष्ट्र

व्यंकटराव हायस्कूलमध्ये शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

रोजरी चर्च, आजरा येथे मारिया मातेची मिरवणूक उत्साहात व प्रार्थनामय वातावरणात संपन्न
सांस्कृतिक

रोजरी चर्च, आजरा येथे मारिया मातेची मिरवणूक उत्साहात व प्रार्थनामय वातावरणात संपन्न

पैशांचे पाकीट परत करून शाळकरी विद्यार्थ्यांनी जपला प्रामाणिकपणा; आजऱ्यात संदेश आणि नैतिकचे कौतुक
सामाजिक

पैशांचे पाकीट परत करून शाळकरी विद्यार्थ्यांनी जपला प्रामाणिकपणा; आजऱ्यात संदेश आणि नैतिकचे कौतुक

शासकीय जिल्हास्तर नेटबॉल स्पर्धेत आजरा महाविद्यालयाच्या मुलींचे यश.
क्रीडा

शासकीय जिल्हास्तर नेटबॉल स्पर्धेत आजरा महाविद्यालयाच्या मुलींचे यश.

ANCHOR AD SLOT