आजरा (प्रतिनिधी):
दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर (आजरा), तालुका विधी सेवा समिती (आजरा), वकील बार असोसिएशन (आजरा) आणि व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (आजरा) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आजरा येथे पार पडणार आहे.
या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार खालील महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल:
इयत्ता पहिली ते पाचवी: 'माय बॉडी, माय सेफ्टी' (My Body, My Safety)
इयत्ता सहावी ते बारावी: 'नो द लॉ, प्रोटेक्ट युअर फ्युचर' (Know the Law, Protect Your Future)
सर्वसमावेशक विषय: बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ (POCSO Act)
प्रमुख मार्गदर्शक व उपस्थिती:
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून आजरा दिवाणी न्यायालयाचे कनिष्ठ स्तर न्यायाधीश मा. श्री. आर. पी. थोरे उपस्थित राहणार आहेत. तसेच आजरा बार असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. संजय रा. पोवार, ॲडव्होकेट मा. श्रीमती सुनिता डी. पाटील आणि ॲडव्होकेट मा. श्री. आर. एस. चव्हाण हे विविध कायदेविषयक बाबींवर मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट मा. श्री. डी. डी. आजगेकर करणार आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी व त्यांना स्वसंरक्षणाचे धडे मिळावेत, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मार्गदर्शन शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश श्री. आर. पी. थोरे यांनी केले आहे.