सारथी महाराष्ट्राचा
newspaper ई-पेपर
search

रोझरी इंग्लिश स्कूल, आजरा येथे हिरक महोत्सवाचा भव्य व दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

रोझरी इंग्लिश स्कूल, आजरा येथे हिरक महोत्सवाचा भव्य व दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न
“

'रोझरी इंग्लिश स्कूल'च्या हिरक महोत्सवी वर्षाचा (१९६७-२०२७) भव्य आणि दिमाखदार उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

आजरा: गोपाळ गडकरी,

येथील नामांकित शैक्षणिक संस्था 'रोझरी इंग्लिश स्कूल'च्या हिरक महोत्सवी वर्षाचा (१९६७-२०२७) भव्य आणि दिमाखदार उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

शाळेचा ऐतिहासिक रेव्ह. फादर जेकब कार्वाल्हो एस.जे. मेमोरियल स्टेज परिसर रोषणाईने उजळून निघाला होता.

​समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बिशप एमेरिटस अतिमहामहीम ऑलविन बॅरेटो उपस्थित होते. याप्रसंगी सिंधुदुर्ग धर्मप्रांतातील रेव्हरंड फादर्स, सिस्टर्स, शाळा व्यवस्थापन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.

​कार्यक्रमाची सुरुवात सना तकीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कथक स्वागत नृत्याने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते हिरक महोत्सवी वर्षाच्या अधिकृत ‘लोगो’चे अनावरण करण्यात आले.

​बिशप ऑलविन बॅरेटो यांनी आशिर्वचन देताना शाळेच्या निस्वार्थ सेवेचे कौतुक केले. ते म्हणाले, "रोझरी शाळेने दर्जेदार शिक्षणासोबत विद्यार्थ्यांवर दणकट संस्कार केले आहेत. माजी विद्यार्थी, कार्यरत शिक्षक व पालकांच्या प्रेमातून ही संस्था अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहील." फादर रिचर्ड सालदाना यांनी शाळेचा प्रगतीचा आलेख मांडला. तसेच 'आरसा' (AARSA) चे अध्यक्ष डॉ. रोझारियो डिसोझा आणि प्रकाश कार्व्हालो यांनी आठवणींना उजाळा देत शुभेच्छा दिल्या.

​कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेले विशेष नाटक "६० वर्षांचा कालप्रवास" विद्यार्थ्यांनी सादर केले. जेसिका कुटीन्हो व सौ. संयोगिता वाळके यांच्या दिग्दर्शनाखालील या नाटकाने प्रेक्षकांना १९६७ ते २०२६ या साठ वर्षांच्या आठवणींचा प्रवास घडवून आणला. स्टीफन फर्नांडिस व जीतन यांनी तयार केलेले जुन्या आठवणींचे संगीतमय सादरीकरण भावुक ठरले.


​शाळा व्यवस्थापक फादर मेल्विन पायस व संयोजक श्री. स्टीफन डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला. मुख्याध्यापक मनवेल बार्देसकर यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक विजय केसरकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर आशिष फर्नांडिस यांनी आगामी २०२७ च्या कॅलेंडरचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सांचेझ डिसोझा व सौ. शैलजा कांबळे यांनी केले, तर आभार संयोजक स्टीफन डिसोझा यांनी मानले.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

आजरा हायस्कूलमध्ये पारंपरिक वेशभूषेत 'शाही दसरा मेळावा' उत्साहात संपन्न
महाराष्ट्र

आजरा हायस्कूलमध्ये पारंपरिक वेशभूषेत 'शाही दसरा मेळावा' उत्साहात संपन्न

मडिलगे येथे १५ ऑक्टोबरला भव्य सामूहिक कुंकुमार्चन सोहळा; महिलांना उपस्थित राहण्याचे आवाहन
मनोरंजन

मडिलगे येथे १५ ऑक्टोबरला भव्य सामूहिक कुंकुमार्चन सोहळा; महिलांना उपस्थित राहण्याचे आवाहन

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने
महाराष्ट्र

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने

परंपरेच्या रंगात रंगली शाळा!
महाराष्ट्र

परंपरेच्या रंगात रंगली शाळा!

ANCHOR AD SLOT