रामतीर्थ न्यूज
newspaper ई-पेपर
search

जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत आजरा महाविद्यालयाच्या खेळाडूंचे देदीप्यमान यश

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत आजरा महाविद्यालयाच्या खेळाडूंचे देदीप्यमान यश
“

रिले स्पर्धेत मुला-मुलींच्या संघांची बाजी; संस्था पदाधिकारी व शिक्षकांकडून अभिनंदन

आजरा : प्रतिनिधी,

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या शासकीय जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत आजरा महाविद्यालय, आजरा (ज्युनिअर विभाग) च्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत विविध रिले प्रकारांत यश संपादन केले आहे.

​या स्पर्धेत मुलींच्या संघाने चमकदार कामगिरी करत ४x१०० मीटर रिले स्पर्धेत द्वितीय क्रमांक, तर ४x४०० मीटर रिले स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. या यशस्वी संघामध्ये प्रांजली पाटील, स्नेहल इलगे, विजयालक्ष्मी पाटील, गायत्री पाटील, आर्या जाधव, भक्ती सुतार, नंदिनी शिवनगेकर आणि श्रुती गुरव या खेळाडूंचा समावेश होता.

​तसेच मुलांच्या गटात ४x१०० मीटर रिले संघाने तृतीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या संघात सिद्धेश कांबळे, मोहम्मद जुनेद मुल्ला, महंमद सिद्दिकी महागोंडे, आयान शेख आणि हुजेफा दरवाजकर या खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

​सर्व यशस्वी खेळाडूंना जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय अशोकअण्णा चराटी, उपाध्यक्ष श्री. विलास नाईक, सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. पोतदार, उपप्राचार्य प्रा. डी. पी. संकपाळ, पर्यवेक्षक प्रा. एम. एस. पाटील तसेच कार्यालयीन अधीक्षक श्री. वाय. आय. पाटील यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक प्रा. ए. एस. फर्नांडिस व डॉ. डी. जे. पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

नवीनतम अद्यतन

पैशांचे पाकीट परत करून शाळकरी विद्यार्थ्यांनी जपला प्रामाणिकपणा; आजऱ्यात संदेश आणि नैतिकचे कौतुक
सामाजिक

पैशांचे पाकीट परत करून शाळकरी विद्यार्थ्यांनी जपला प्रामाणिकपणा; आजऱ्यात संदेश आणि नैतिकचे कौतुक

वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित स्पर्धांमध्ये डॉ. झाकीर हुसेन हायस्कूलच्या यूसरा बुड्ढेखानचे घवघवीत यश; वनविभागातर्फे सत्कार
महाराष्ट्र

वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित स्पर्धांमध्ये डॉ. झाकीर हुसेन हायस्कूलच्या यूसरा बुड्ढेखानचे घवघवीत यश; वनविभागातर्फे सत्कार

आजरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय रिले स्पर्धेत यश
शैक्षणिक

आजरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय रिले स्पर्धेत यश

वाचनाच्या बळावर जग जिंकण्याची क्षमता निर्माण होते : प्रा. मनोजकुमार पाटील
महाराष्ट्र

वाचनाच्या बळावर जग जिंकण्याची क्षमता निर्माण होते : प्रा. मनोजकुमार पाटील

ANCHOR AD SLOT