रामतीर्थ न्यूज
newspaper ई-पेपर
search

गुरूंच्या ज्ञानाचा आदर हीच खरी गुरुसेवा : संजय साबळे

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

गुरूंच्या ज्ञानाचा आदर हीच खरी गुरुसेवा : संजय साबळे
“

चंदगड येथे ‘ताल साधना’तर्फे संगीत साधक, गुरुवर्य आणि महिला हरिपाठ मंडळांचा गौरव

चंदगड : प्रतिनिधी,

"गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा आदर करणे, त्यांच्या शिकवणीचा जीवनात अंगीकार करणे आणि संगीताच्या माध्यमातून समाजात आनंद व माणुसकीचा सुगंध पसरवणे, हीच खरी गुरुसेवा आहे," असे प्रतिपादन प्रमुख वक्ते संजय साबळे यांनी केले. ताल साधना संगीत प्रतिष्ठान, चंदगड यांच्या वतीने आयोजित ‘गुरुसेवा संगीत साधनेचा गौरव’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश वाईंगडे होते, तर माजी मंत्री भरमू आण्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

​पुढे बोलताना साबळे म्हणाले, "गुरू शिष्याला केवळ स्वर आणि ताल शिकवत नाहीत, तर संयम, नम्रता, शिस्त आणि माणुसकीचे संस्कारही देतात. शिष्य कितीही मोठा कलाकार झाला, तरी त्याने गुरूंना विसरू नये. झाड कितीही उंच वाढले, तरी त्याला आपली मुळे विसरून चालत नाहीत. गुरूंच्या ज्ञानाचा आदर करून त्यांची शिकवण पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, हीच खरी गुरुदक्षिणा ठरते."

​याप्रसंगी चंदगड पंचायत समितीचे सभापती प्रा. विलास नाईक म्हणाले, "संगीत ही केवळ कला नसून माणसांना जोडणारी शक्ती आहे. भजन, कीर्तन आणि वारकरी परंपरेतून समाजात भक्ती व सद्भावना रुजते. चंदन स्वतः झिजून दुसऱ्याला सुगंध देते, त्याचप्रमाणे गुरू आपल्या ज्ञानातून शिष्यांचे जीवन घडवतात. चंदगडची माणसेही आपुलकी, कष्ट आणि परोपकारामुळे चंदनासारखी आहेत." संगीत परंपरेच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

​कार्यक्रमादरम्यान माजी मंत्री भरमू आण्णा पाटील आणि भारती पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

​मान्यवर व महिला मंडळांचा गौरव

या सोहळ्यात मृदंगमणी ह.भ.प. अर्जुन दळवी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ह.भ.प. सखाराम पवार, सयाजी सुतार, विजय मटकर, अशोक मटकर आणि भाऊ गावडे यांचा सन्मान करण्यात आला. यासोबतच तालुक्यातील विविध महिला हरिपाठ मंडळांचाही विशेष गौरव करण्यात आला.

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय ठोणूक्षे यांनी केले. सूत्रसंचालन आर. डी. पाटील यांनी केले, तर आभार किशोर पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ताल साधना संगीत प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर सुतार, सटुप्पा कडूकर, वैभव मुळीक, मारुती गुरव, किशोर पाटील आणि शिवाजी निंबाळकर यांनी परिश्रम घेतले. सोहळ्यास परिसरातील संगीतप्रेमी, नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

रोजरी चर्च, आजरा येथे मारिया मातेची मिरवणूक उत्साहात व प्रार्थनामय वातावरणात संपन्न
सांस्कृतिक

रोजरी चर्च, आजरा येथे मारिया मातेची मिरवणूक उत्साहात व प्रार्थनामय वातावरणात संपन्न

आजरा तालुक्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शांततेत मतदान
महाराष्ट्र

आजरा तालुक्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शांततेत मतदान

रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात संपन्न; चिमुरड्यांच्या हातात झाली 'पुस्तकांची पेरणी'
शैक्षणिक

रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात संपन्न; चिमुरड्यांच्या हातात झाली 'पुस्तकांची पेरणी'

रोझरी इंग्लिश स्कूल, आजरा येथे हिरक महोत्सवाचा भव्य व दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न
देश

रोझरी इंग्लिश स्कूल, आजरा येथे हिरक महोत्सवाचा भव्य व दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न

ANCHOR AD SLOT