रामतीर्थ न्यूज
newspaper ई-पेपर
search

शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी जबरदस्ती करू नका, चालू वर्षाचे व्याज माफ करा!

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी जबरदस्ती करू नका, चालू वर्षाचे व्याज माफ करा!
“

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आजरा तहसीलदारांना निवेदन

आजरा : प्रतिनिधी,

शासनाने आजरा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केला असल्याने तालुक्यातील बँका, पतसंस्था व फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी जबरदस्ती अथवा तगादा लावू नये, तसेच चालू आर्थिक वर्षाचे व्याज माफ करावे, या मागणीचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आजरा तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले.

​निवेदनात म्हटले आहे की, चालू वर्षी तालुक्यामध्ये ‘अल-निनो’च्या प्रभावामुळे अत्यंत कमी पाऊस झाला. परिणामी शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिके वाळून करपून गेली. उत्पादनात मोठी घट झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून त्याला घेतलेले कर्ज परतफेड करणे पूर्णपणे अशक्य झाले आहे. अशा बिकट परिस्थितीतही तालुक्यातील बँका, वित्तीय संस्था आणि पतसंस्था शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी सातत्याने तगादा लावत आहेत.

​शासनाने आजरा तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केलेला असल्याने प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करावा. बँका व फायनान्स कंपन्यांना कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांवर सक्ती न करण्याच्या सूचना द्याव्यात, तसेच शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी चालू वर्षाचे व्याज माफ करण्यात यावे, अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

​यावेळी उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार, शेतकरी सेना तालुका प्रमुख दिनेश कांबळे, शिवाजी आडाव, संजय सावंत (देऊळवाडी), सुयश पाटील यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

आजरा येथे ‘आयुष्य न्यूट्रिशन सेंटर’चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न
आरोग्य

आजरा येथे ‘आयुष्य न्यूट्रिशन सेंटर’चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न

आजऱ्यातील सांडपाण्यामुळे नदी प्रदूषण -७ डिसेंबर रोजी बेमुदत उपोषणाचा इशारा
महाराष्ट्र

आजऱ्यातील सांडपाण्यामुळे नदी प्रदूषण -७ डिसेंबर रोजी बेमुदत उपोषणाचा इशारा

श्री रवळनाथ मंदिर देवस्थानतर्फे बांधकाम कारागिरांना दिवाळी फराळ व साहित्याची भेट
सामाजिक

श्री रवळनाथ मंदिर देवस्थानतर्फे बांधकाम कारागिरांना दिवाळी फराळ व साहित्याची भेट

एरंडोलचे ज्येष्ठ समाजसेवक कै. बाबाजी भाऊ नाईक यांचे निधन
सामाजिक

एरंडोलचे ज्येष्ठ समाजसेवक कै. बाबाजी भाऊ नाईक यांचे निधन

ANCHOR AD SLOT