रामतीर्थ न्यूज
newspaper ई-पेपर
search

पं. दीनदयाळ विद्यालयाची विद्यार्थिनी मीरा हरेर हिचे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्ण यश;

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

पं. दीनदयाळ विद्यालयाची विद्यार्थिनी मीरा हरेर हिचे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्ण यश;

रवळनाथ पतसंस्थेकडून कर्मचाऱ्यांना १६ टक्के बोनसची दिवाळी भेट; संस्थेच्या ठेवी २७ कोटींच्या पुढे

​दोन महिन्यांचा पगार, फराळ व साहित्याचे वाटप; कर्मचारीवर्गात आनंदाचे वातावरण

​आजरा : विशेष प्रतिनिधी

श्री रवळनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, आजरा यांच्या वतीने दीपावलीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना १६ टक्के बोनस (दोन महिन्यांचे वेतन) जाहीर करून सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला आहे. रोख बोनससह सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ व आवश्यक साहित्याचेही वाटप करण्यात आले असून, संस्थेच्या या निर्णयामुळे कर्मचारीवर्गातून समाधान व आनंद व्यक्त होत आहे.

​कर्मचाऱ्यांचे योगदान आणि प्रामाणिक मेहनतीची दखल घेत पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी दिवाळी बोनस दिला जातो. यंदाही संस्थेने परंपरा कायम राखत कर्मचाऱ्यांना दोन पगारांची आर्थिक भेट दिली आहे.

​याप्रसंगी संस्थेचे चेअरमन अभिषेक शिंपी यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा मांडला. ते म्हणाले, "सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांचा अखंड विश्वास, संचालक मंडळाचे दूरदर्शी नियोजन आणि कर्मचारीवर्गाची निष्ठा या त्रिसूत्रीमुळे संस्थेच्या एकूण ठेवींनी २७ कोटी रुपयांचा टप्पा यशस्वीपणे ओलांडला आहे. संस्था आर्थिकदृष्ट्या सातत्याने सक्षम आणि भक्कम वाटचाल करत आहे."

​या कार्यक्रमास व्हा. चेअरमन समीर गुंजाटी, संचालक माजिद मुराद, युसुफ गवसेकर, विक्रम पटेकर, किरण कांबळे, इब्राहिम इंचनाळकर, विलास कुंभार, विश्वास जाधव, सुधीर नार्वेकर, सौ. अर्चना मराठे, सौ. माधुरी पाचवडेकर तसेच व्यवस्थापक विश्वास हरेर यांच्यासह इतर पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन आर्थिक पाठबळ देण्याच्या या भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

पं. दीनदयाळ विद्यालयाची विद्यार्थिनी मीरा हरेर हिचे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्ण यश; विभागीय स्पर्धेसाठी निवड

​

जिल्हास्तरीय ‘शोतोकान कराटे’ अजिंक्यपद स्पर्धेत पं. दीनदयाळ विद्यालयाची गुणवंत विद्यार्थिनी कु. मीरा सुनील हरेर हिने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण यश संपादन केले आहे. या देदिप्यमान कामगिरीमुळे तिची रत्नागिरी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

​मीराच्या या उल्लेखनीय यशामागे विद्यालयाचे संस्थाध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर मुंज, सचिव मलिक कुमार बुरुड, मुख्याध्यापक संजीव देसाई यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. तसेच विद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका एस. आर. कुंभार, क्रीडा शिक्षक एस. ए. निर्मळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन लाभले. मीराला तिचे वडील सुनील हरेर यांचेही सतत पाठबळ मिळाले.

​जिल्हास्तरावर विद्यालयाचा नावलौकिक वाढवल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मीराचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, रत्नागिरी येथील विभागीय स्पर्धेतील वाटचालीस तिला विद्यालयाकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तिच्या या यशामुळे सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेजची विभागीय क्रीडा स्पर्धेत दुहेरी चमक; यश वाके आणि जैनब मुल्ला यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

​पालघर येथे होणाऱ्या मैदानी स्पर्धेत चंदगडचे खेळाडू दाखवणार कौशल्य

​चंदगड :

डेरवण (जि. रत्नागिरी) येथे नुकत्याच संपन्न झालेल्या विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत चंदगड येथील न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. थाळीफेक आणि भालाफेक प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावून कु. यश विजय वाके आणि कु. जैनब अस्लम मुल्ला या दोघांनीही राज्यस्तरीय स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित केला आहे.

​स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अकरावी विज्ञान शाखेचा गुणवंत खेळाडू कु. यश विजय वाके याने थाळीफेक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी नोंदवत द्वितीय क्रमांक संपादन केला. तर १९ वर्षांखालील मुलींच्या गटात बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु. जैनब अस्लम मुल्ला हिने भालाफेक क्रीडा प्रकारात प्रभावी फेकीसह द्वितीय क्रमांक पटकावला. या दैदिप्यमान यशाच्या जोरावर दोन्ही खेळाडूंची पालघर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

​या यशाबद्दल शालेय समितीचे चेअरमन ॲडव्होकेट एन. एस. पाटील, प्राचार्य आर. पी. पाटील, उपप्राचार्य टी. एस. चांदेकर तसेच पर्यवेक्षक एस. एल. बेळगावकर यांनी यशस्वी खेळाडूंचे विशेष कौतुक करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

​दोन्ही खेळाडूंना कॉलेजचे क्रीडाशिक्षक प्रा. एन. डी. हदगल व प्रा. टी. व्ही. खंदाळे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल परिसरातून व क्रीडा क्षेत्रातून या गुणवंत खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; ८ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त, आजरा व मुरगूडमधील २ गुन्हे उघडकीस

​कोल्हापूर :

दिवसा घरफोड्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने कागल ते निढोरी जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून ताब्यात घेतले आहे. कपिल प्रकाश सातवेकर (वय ३१, रा. बसवेश्वर देवालय, पिंपळगाव खुर्द, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ८ लाख २२ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे आजरा आणि मुरगूड पोलीस ठाण्यातील दोन गंभीर घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

​बहिरेवाडीतील चोरीनंतर तपासाची चक्रे फिरली

२५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ ते १ च्या सुमारास बहिरेवाडी (ता. आजरा) येथील संजय दत्तात्रय इंचनाळकर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा भरदिवसा घडल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना सखोल तपासाचे निर्देश दिले.

​सापळा रचून मुसक्या आवळल्या

पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. दरम्यान, पोलीस अंमलदार रोहीत मर्दने, समीर कांबळे, संदीप गायकवाड व राजू कोरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संबंधित संशयित चोरलेले दागिने विकण्यासाठी पिंपळगाव हद्दीतील कागल ते निढोरी रस्त्यावर येणार आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी ३१ ऑक्टोबर रोजी सापळा रचून कपिल सातवेकर याला ताब्यात घेतले.

​१५ गुन्ह्यांची नोंद असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार

पोलिसांनी कसून चौकशी केली असता, संशयित आरोपी कपिल सातवेकर याने आजरा पोलीस ठाणे हद्दीतील तसेच मुरगूड पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीची कबुली दिली. आरोपीवर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे तब्बल १५ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. जप्त मुद्देमालासह आरोपीला पुढील कारवाईसाठी आजरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

​ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार युवराज पाटील, योगेश गोसावी, शुभम संकपाळ, अमित सर्जे, रोहीत मर्दने, समीर कांबळे, संदीप गायकवाड, राजू कोरे, सतिश जंगम, संजय हुंबे, अशोक पवार, सतिश सुर्यवंशी आणि अमित मर्दने यांच्या पथकाने केली.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

६ वर्षांचा अंधार संपला! आजरा–गांधीनगर रस्त्यावरील मंजीरीतील पथदिवे अखेर लखलखले
महाराष्ट्र

६ वर्षांचा अंधार संपला! आजरा–गांधीनगर रस्त्यावरील मंजीरीतील पथदिवे अखेर लखलखले

शासकीय जिल्हास्तर नेटबॉल स्पर्धेत आजरा महाविद्यालयाच्या मुलींचे यश.
क्रीडा

शासकीय जिल्हास्तर नेटबॉल स्पर्धेत आजरा महाविद्यालयाच्या मुलींचे यश.

‘कै. बाबुरावजी कुंभार स्मृती चषका’वर शृंगारवाडी वॉरियर्सचा कब्जा!
क्रीडा

‘कै. बाबुरावजी कुंभार स्मृती चषका’वर शृंगारवाडी वॉरियर्सचा कब्जा!

व्यंकटराव हायस्कूलमध्ये तालुका विधी सेवा समिती, वकील बार असोसिएशन व शिक्षण संकुलातर्फे कायदेविषयक मार्गदर्शन संपन्न
महाराष्ट्र

व्यंकटराव हायस्कूलमध्ये तालुका विधी सेवा समिती, वकील बार असोसिएशन व शिक्षण संकुलातर्फे कायदेविषयक मार्गदर्शन संपन्न

ANCHOR AD SLOT