रामतीर्थ न्यूज
newspaper ई-पेपर
search

आजऱ्यातील सांडपाण्यामुळे नदी प्रदूषण -७ डिसेंबर रोजी बेमुदत उपोषणाचा इशारा

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

आजऱ्यातील सांडपाण्यामुळे नदी प्रदूषण -७ डिसेंबर रोजी बेमुदत उपोषणाचा इशारा
“

सरपंच परिषद व नदीकाठच्या ग्रामस्थांचा ७ डिसेंबर रोजी बेमुदत उपोषणाचा इशारा

आजरा: प्रतिनिधी,

आजरा शहरातील मैलायुक्त सांडपाणी व विविध व्यावसायिकांचे दूषित पाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने हिरण्यकशी व चित्री नदीचे पाणी प्रचंड दूषित झाले आहे. प्रशासनाच्या या उदासीन व हलगर्जी कारभाराविरोधात सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) आजरा शाखा व नदीकाठच्या बाधित ग्रामस्थांच्या वतीने ७ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून आजरा नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

​प्रशासनाकडून दोन वर्षांपासून दुर्लक्ष

गेल्या दोन वर्षांपासून या गंभीर समस्येबाबत वारंवार लेखी व तोंडी निवेदने देऊनही आजरा नगरपंचायत प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. गावातील सिमेंटच्या (RCC) गटारांमुळे पाणी जमिनीत मुरण्याची नैसर्गिक प्रक्रिया थांबली असून हजारो लिटर सांडपाणी ओढ्या-नाल्यांमार्फत थेट नदीपात्रात मिसळत आहे. विशेषतः लेंड ओहळ व वडारचा गोंड यांसारख्या मोठ्या नाल्यांमधून हे दूषित पाणी प्रक्रिया न करता नदीत सोडले जात आहे.

​कत्तलखाना व इतर व्यवसायांच्या दूषित पाण्याचा धोका

लेंड ओहळाच्या काठावर असणारी हॉटेल्स, बेकरी, केशकर्तनालय, किराणा दुकाने, चर्मकार उद्योग, जनावरांचा कत्तलखाना तसेच मत्स्य खरेदी-विक्री केंद्रांमधील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट ओढ्यात येत आहे. कत्तलखान्यातील रक्तमिश्रित पाणी नदीपात्रातून थेट जॅकवेलमध्ये येत असल्याने पिण्याच्या पाण्याला दुर्गंधी येत असून नागरिकांच्या जिवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. नदीकाठच्या गावांना जॅकवेलमधून हेच अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्याने कावीळ व इतर साथीचे आजार पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत गजरगाव, होनेवाडी, हात्तिवडे, मेंढोली-बोलकेवाडी आणि चांदेवाडी ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत विशेष ठराव मंजूर करून कत्तलखाना बंद करणे व सांडपाणी प्रक्रिया केंद्राची (STP) मागणी लावून धरली आहे.

​प्रमुख मागण्या

​अशुद्ध व दूषित पाण्याच्या समस्येवर तात्काळ आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे.

​सांडपाणी प्रक्रिया केंद्र (STP) तातडीने उभारणे.

​लेंड ओहळातील कत्तलखाना तातडीने बंद करणे अथवा इतरत्र हलविणे.

​प्रत्येकाचे सांडपाणी शोषखड्ड्याद्वारे जमिनीत मुरवणे अथवा त्यावर प्रक्रिया करून शेतीसाठी पुनर्वापर करणे.

​या गंभीर समस्येवर तत्काळ तोडगा न निघाल्यास ७ डिसेंबर २०२६ पासून नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

​या निवेदनावर सरपंच परिषदेचे महिला तालुकाध्यक्षा सौ. वनश्री देसाई, तालुकाध्यक्ष श्री. पांडुरंग तोरस्कर, जिल्हाध्यक्ष इंजि. जी. एम. पाटील, प्रदेश सरचिटणीस श्री. राजू पोतणीस यांच्यासह सरपंच श्री. विलास जोशिलकर (मेंढोली), सौ. वैशाली गुरव (बुरुडे), श्री. वसंत कोटुस्कर (सोहाळे), सौ. शकुंतला सुतार (हत्तिवडे), श्री. अनिल पाटील (मुरुडे), श्री. संजय सावंत(देऊळवाडी), श्री. पांडुरंग खवरे (सुलगाव), श्री. दळवी ( चाफवडे) आदी सरपंचांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

श्री रवळनाथ मंदिर देवस्थानतर्फे बांधकाम कारागिरांना दिवाळी फराळ व साहित्याची भेट
सामाजिक

श्री रवळनाथ मंदिर देवस्थानतर्फे बांधकाम कारागिरांना दिवाळी फराळ व साहित्याची भेट

३५ वर्षांच्या ज्ञानदानाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आदर्श शिक्षक दशरथ अस्वले सर सेवानिवृत्त
शैक्षणिक

३५ वर्षांच्या ज्ञानदानाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आदर्श शिक्षक दशरथ अस्वले सर सेवानिवृत्त

माध्यमिक विद्यालय आरदाळ येथे 'शाही दसरा' व 'आनंददायी शनिवार' उपक्रम उत्साहात संपन्न
शैक्षणिक

माध्यमिक विद्यालय आरदाळ येथे 'शाही दसरा' व 'आनंददायी शनिवार' उपक्रम उत्साहात संपन्न

पं. दीनदयाळ विद्यालयाची विद्यार्थिनी मीरा हरेर हिचे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्ण यश;
महाराष्ट्र

पं. दीनदयाळ विद्यालयाची विद्यार्थिनी मीरा हरेर हिचे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्ण यश;

ANCHOR AD SLOT