रामतीर्थ न्यूज
newspaper ई-पेपर
search

मराठी रंगभूमीचा समृद्ध वारसा जतन करणे गरजेचे – प्रा. विनायक चव्हाण

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

मराठी रंगभूमीचा समृद्ध वारसा जतन करणे गरजेचे – प्रा. विनायक चव्हाण
“

आजरा महाविद्यालयात 'मराठी रंगभूमी दिन' उत्साहात साजरा; नाट्यकलेतून समाजप्रबोधन झाल्याचे प्रतिपादन

आजरा (प्रतिनिधी) :

विद्यार्थ्यांनी नाट्यकलेची आवड जोपासून मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. विनायक चव्हाण यांनी येथे केले. आजरा महाविद्यालय, आजरा येथील मराठी विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मराठी रंगभूमी दिन' कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. किरण पोतदार होते.

​कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. विनायक चव्हाण यांनी मराठी रंगभूमीचा गौरवशाली इतिहास, परंपरा, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानावर सविस्तर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, "मराठी रंगभूमीने सातत्याने समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून मोलाची भूमिका बजावली आहे. नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजातील वास्तव, मानवी नातेसंबंध, ज्वलंत प्रश्न आणि परिवर्तनवादी विचार मांडणारी एक सशक्त कला आहे." या वेळी त्यांनी रंगभूमीच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या दिग्गज नाटककार, दिग्दर्शक व कलावंतांच्या कार्याचाही आढावा घेतला.

​अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्य डॉ. किरण पोतदार यांनी मराठी रंगभूमीला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक मानले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी नाट्यकला आणि सांस्कृतिक उपक्रमांचा सहभाग अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले.

​कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी करून रंगभूमी दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन डॉ. आप्पासाहेब बुडके यांनी केले, तर आभार प्रा. सुषमा नलावडे यांनी मानले.

​या प्रसंगी प्रा. योगिता भोकरे, प्रा. वैशाली देसाई, अरमान दड्डीकर यांच्यासह सांस्कृतिक विभागाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

श्री रवळनाथ मंदिर देवस्थानतर्फे बांधकाम कारागिरांना दिवाळी फराळ व साहित्याची भेट
सामाजिक

श्री रवळनाथ मंदिर देवस्थानतर्फे बांधकाम कारागिरांना दिवाळी फराळ व साहित्याची भेट

शिवराज महाविद्यालयाच्या ऋतुजा पाटीलची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी निवड!
क्रीडा

शिवराज महाविद्यालयाच्या ऋतुजा पाटीलची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी निवड!

आजरा–महागाव मार्गावर सकाळच्या फेरफटक्यासाठी ‘श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स’कडून सिमेंट बाकडी (बेंच) उपलब्ध
सामाजिक

आजरा–महागाव मार्गावर सकाळच्या फेरफटक्यासाठी ‘श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स’कडून सिमेंट बाकडी (बेंच) उपलब्ध

आजरा डायग्नोस्टिक सेंटर अचूक निदान… निरोगी भविष्य…!
आरोग्य

आजरा डायग्नोस्टिक सेंटर अचूक निदान… निरोगी भविष्य…!

ANCHOR AD SLOT