रामतीर्थ न्यूज
newspaper ई-पेपर
search

गणपती मखर सजावट स्पर्धेत कालकुंद्रीच्या श्रीकांत पाटील यांच्या आरास सजावटीला तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

गणपती मखर सजावट स्पर्धेत कालकुंद्रीच्या श्रीकांत पाटील यांच्या आरास सजावटीला तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार
“

प्रबोधनात्मक व पर्यावरणपूरक संकल्पना ठरली लक्षवेधी

चंदगड : प्रतिनिधी,

नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात सावरकर नगर कालकुंद्री येथील रहिवासी, सेवानिवृत्त केंद्र मुख्याध्यापक व पत्रकार श्रीकांत वैजनाथ पाटील यांच्या घरातील इको-फ्रेंडली (पर्यावरणपूरक) गणपती मखर व आरास सजावटीने तालुका, जिल्हा तसेच राज्यपातळीवर विविध पारितोषिके पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

​महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत पाटील यांच्या पर्यावरणपूरक सजावटीला राज्यस्तरीय पारितोषिक जाहीर झाले. रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी (मुंबई) येथे २६ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ओंकार राऊत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हे पारितोषिक श्रीकांत पाटील यांचे सुपुत्र विशाल पाटील व स्नुषा सौ. प्राची विशाल पाटील यांनी स्वीकारले.

​याशिवाय, महाधुरळा न्यूज चॅनेल व स्वराज्य महिला मंच, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत या सजावटीने उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक पटकावला. तसेच लक्ष्मण गावडे फाउंडेशन, चंदगड आयोजित तालुकास्तरीय पर्यावरणपूरक घरगुती आरास स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. चंदगडचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या हस्ते श्रीकांत पाटील यांना शाल, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रुपये ६,५५५/- देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे होते; तर जि. प. सदस्या राजश्री गावडे व झांबरे गावचे सरपंच विष्णू गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

​प्रबोधनात्मक व पर्यावरणपूरक संकल्पना ठरली लक्षवेधी

पाटील यांच्या घरातील सजावट पूर्णपणे प्लास्टिकमुक्त व पर्यावरणपूरक होती. 'घरोघरी ग्रंथालय आणि वाचन संस्कृती' जपण्याचा संदेश देत पुस्तकांच्या आकर्षक मांडणीतून प्रभावी समाजप्रबोधन करण्यात आले होते. यामध्ये महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याचा गौरव करणारी मांडणी करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही फटाकेमुक्त गणेशोत्सव साजरा करून पाटील कुटुंबीयांनी सामाजिक भान जपले. परीक्षकांनी या सर्व वैशिष्ट्यांची विशेष दखल घेतली.

​या पर्यावरणपूरक उपक्रमासाठी सौ. शोभा श्रीकांत पाटील, दीपक वै. पाटील, कु. वैष्णवी दीपक पाटील व सौ. प्रभावती दीपक पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तिन्ही स्तरांवर मिळालेल्या या बहुमानाबद्दल पाटील कुटुंबीयांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

उपदेश नव्हे, कृतीतून श्रमप्रतिष्ठेचा संस्कार!
शैक्षणिक

उपदेश नव्हे, कृतीतून श्रमप्रतिष्ठेचा संस्कार!

गडहिंग्लजचा दुष्काळी यादीत समावेश करण्यासाठी धरणे आंदोलन;
कृषी

गडहिंग्लजचा दुष्काळी यादीत समावेश करण्यासाठी धरणे आंदोलन;

जनता सहकारी गृहतारण संस्थेमार्फत कर्मचाऱ्यांसाठी CBS बँकिंग प्रशिक्षण शिबिर संपन्न
अर्थव्यवस्था

जनता सहकारी गृहतारण संस्थेमार्फत कर्मचाऱ्यांसाठी CBS बँकिंग प्रशिक्षण शिबिर संपन्न

डॉ. अनिल देशपांडे यांना राज्यस्तरीय 'आयएमए प्रेसिडेंट ॲप्रिसिएशन ॲवॉर्ड' जाहीर
देश

डॉ. अनिल देशपांडे यांना राज्यस्तरीय 'आयएमए प्रेसिडेंट ॲप्रिसिएशन ॲवॉर्ड' जाहीर

ANCHOR AD SLOT