रामतीर्थ न्यूज
newspaper ई-पेपर
search

गडहिंग्लजचा दुष्काळी यादीत समावेश करण्यासाठी धरणे आंदोलन;

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

गडहिंग्लजचा दुष्काळी यादीत समावेश करण्यासाठी धरणे आंदोलन;
“

आज दुसरा दिवस, विविध घटकांचा वाढता पाठिंबा

गडहिंग्लज: प्रतिनिधी,

गडहिंग्लज तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन तालुक्याचा समावेश तातडीने दुष्काळी तालुक्यांच्या यादीत करावा, या प्रमुख मागणीसाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सुरू करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाचा आज (दि. ३०) दुसरा दिवस होता. काल, २९ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या आंदोलनाला विविध सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक संघटनांकडून मोठा पाठिंबा मिळत असून आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.

​हे आंदोलन गडहिंग्लज तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आजी-माजी सदस्यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आले आहे. तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, पीक विमा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करणे आणि जनावरांच्या चाऱ्याची सोय करणे अशा मागण्यांसाठी आंदोलक ठाम आहेत.

​विविध घटकांचा उत्स्फूर्त पाठिंबा

आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी विविध संस्थांनी प्रत्यक्ष भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. यामध्ये गडहिंग्लज तालुका बार असोसिएशनच्या वकिलांनी तसेच गडहिंग्लज नगरपरिषदेच्या आजी-माजी नगरसेवकांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्यांना संपूर्ण पाठिंबा दर्शवला. तसेच नूल गावातील ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनात सहभाग नोंदवला.

​कसबा नूल ग्रामस्थांकडून अल्पोपहार

आंदोलनाला पाठिंबा देण्यासोबतच कसबा नूल येथील ग्रामस्थांनी आज सर्व आंदोलकांसाठी अल्पोपहाराची चोख व्यवस्था केली. दुष्काळाच्या या लढ्यात सर्वसामान्य नागरिकही सक्रिय सहभाग नोंदवत असल्याचे या माध्यमातून दिसून आले.

​शासनाने गडहिंग्लज तालुक्यातील गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन तालुक्याला दुष्काळी जाहीर करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी उपस्थित सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांनी दिला.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

नवीनतम अद्यतन

भीमाशंकर परिसरातील वृक्षतोड तत्काळ थांबवा; आजऱ्यात वृक्षप्रेमी समूहाचे तहसीलदारांना निवेदन
देश

भीमाशंकर परिसरातील वृक्षतोड तत्काळ थांबवा; आजऱ्यात वृक्षप्रेमी समूहाचे तहसीलदारांना निवेदन

आजऱ्याच्या व्यंकटराव हायस्कूलमध्ये 'हादगा बोळवण' समारंभ उत्साहात; साडेचारशे विद्यार्थिनींचा सहभाग
महाराष्ट्र

आजऱ्याच्या व्यंकटराव हायस्कूलमध्ये 'हादगा बोळवण' समारंभ उत्साहात; साडेचारशे विद्यार्थिनींचा सहभाग

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने
महाराष्ट्र

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने

व्यंकटराव शिक्षण संकुलात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
शैक्षणिक

व्यंकटराव शिक्षण संकुलात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

ANCHOR AD SLOT