सारथी महाराष्ट्राचा
newspaper ई-पेपर
search

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने
“

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी; आंदोलक तरुणांवरील पोलीस कारवाईचा तीव्र निषेध

आजरा : प्रतिनिधी,

मतदार याद्यांचे संशयास्पद पुनर्निरीक्षण आणि कथित मतचोरीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना मदत करणाऱ्या केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर, लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या या तरुणाईला पाठिंबा दर्शवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवार, दि. १३ रोजी छत्रपती संभाजी चौकात भव्य निदर्शने करण्यात येणार आहेत.

​देशभरात शांततेच्या व सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या युवक-युवतींवर पोलीस बळाचा गैरवापर करून त्यांना हिंसक पद्धतीने ताब्यात घेतले जात आहे. केंद्र व राज्य सरकारची ही दडपशाही लोकशाही मूल्यांचा गळा घोटणारी असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. "लोकशाही टिकवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या निर्भीड तरुणाईच्या पाठीशी महाविकास आघाडी खंबीरपणे उभी आहे," हा संदेश देण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

​सरकारची ही दडपशाही मोडून काढण्यासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी तालुक्यातील नागरिक, कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय घटकांनी मंगळवारी छत्रपती संभाजी महाराज चौक येथे मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

आजरा हायस्कूलमध्ये पारंपरिक वेशभूषेत 'शाही दसरा मेळावा' उत्साहात संपन्न
महाराष्ट्र

आजरा हायस्कूलमध्ये पारंपरिक वेशभूषेत 'शाही दसरा मेळावा' उत्साहात संपन्न

मडिलगे येथे १५ ऑक्टोबरला भव्य सामूहिक कुंकुमार्चन सोहळा; महिलांना उपस्थित राहण्याचे आवाहन
मनोरंजन

मडिलगे येथे १५ ऑक्टोबरला भव्य सामूहिक कुंकुमार्चन सोहळा; महिलांना उपस्थित राहण्याचे आवाहन

परंपरेच्या रंगात रंगली शाळा!
महाराष्ट्र

परंपरेच्या रंगात रंगली शाळा!

बापूसाहेब सरदेसाई हायस्कूलमध्ये 'हादगा बोळवण' उत्साहात; रानफुले-भाज्यांच्या आराशीतून जपली लोकसंस्कृती
महाराष्ट्र

बापूसाहेब सरदेसाई हायस्कूलमध्ये 'हादगा बोळवण' उत्साहात; रानफुले-भाज्यांच्या आराशीतून जपली लोकसंस्कृती

ANCHOR AD SLOT