सारथी महाराष्ट्राचा
newspaper ई-पेपर
search

व्यंकटराव शिक्षण संकुलात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

व्यंकटराव शिक्षण संकुलात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
“

तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या जगाला गांधी विचारांचीच गरज : जयवंतराव शिंपी

आजरा :

येथील व्यंकटराव शिक्षण संकुलात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजरा महाल शिक्षण मंडळाचे चेअरमन श्री. जयवंतरावजी शिंपी यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

​याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री. जयवंतराव शिंपी म्हणाले की, "तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या आजच्या जगाला खऱ्या अर्थाने गांधी विचारांची गरज आहे. गांधीजींच्या अहिंसा तत्त्वाचा स्वीकार संपूर्ण जगाने करणे ही आपल्या भारताची फार मोठी पोचपावती आहे." तसेच 'जय जवान, जय किसान'चा नारा देणारे लालबहादूर शास्त्री यांचे देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असल्याचे मतही त्यांनी मांडले.

​पंचायत समिती शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार कार्यक्रमात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी 'नशामुक्ती' या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थितांचे प्रबोधन केले. या पथनाट्यासाठी श्री. एस. एस. कालेकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व्यंकटराव महाविद्यालय, व्यंकटराव हायस्कूलच्या इयत्ता नववी 'ड' चे विद्यार्थी आणि मार्गदर्शिका सौ. ए. एस. गुरव यांच्या वतीने करण्यात आले होते.

​या कार्यक्रमास आजरा महाल शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष के. जी. पटेकर, खजिनदार सुनील पाटील, संचालक सुधीर जाधव, सचिन (भैय्या) शिंपी, अशोक पोवार, प्रभारी प्राचार्य चंद्रकांत पन्हाळकर, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य संजयकुमार पाटील, पर्यवेक्षिका व्ही. जे. शेलार, ज्येष्ठ शिक्षिका श्रीम. एन. ए. मोरे, सौ. एस. डी. इलगे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. पी. होरटे यांनी केले

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

आजरा हायस्कूलमध्ये पारंपरिक वेशभूषेत 'शाही दसरा मेळावा' उत्साहात संपन्न
महाराष्ट्र

आजरा हायस्कूलमध्ये पारंपरिक वेशभूषेत 'शाही दसरा मेळावा' उत्साहात संपन्न

मडिलगे येथे १५ ऑक्टोबरला भव्य सामूहिक कुंकुमार्चन सोहळा; महिलांना उपस्थित राहण्याचे आवाहन
मनोरंजन

मडिलगे येथे १५ ऑक्टोबरला भव्य सामूहिक कुंकुमार्चन सोहळा; महिलांना उपस्थित राहण्याचे आवाहन

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने
महाराष्ट्र

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने

परंपरेच्या रंगात रंगली शाळा!
महाराष्ट्र

परंपरेच्या रंगात रंगली शाळा!

ANCHOR AD SLOT