रामतीर्थ न्यूज
newspaper ई-पेपर
search

फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनतर्फे दुष्काळग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनतर्फे दुष्काळग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
“

दिवाळीनिमित्त आजरा परिसरातील धनगरवाडी व वाड्या-वस्त्यांवर मदतीचा हात महिनाभराचे अन्नधान्य व साहित्याचे किट वितरित

आजरा (प्रतिनिधी):

समाजातील वंचित व गरजू घटकांची दिवाळी आनंदात जावी या सामाजिक भावनेतून मुकुल माधव फाउंडेशन (पुणे) आणि फिनोलेक्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आजरा तालुक्यात स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील गरजू कुटुंबांना दिवाळीनिमित्त महिनाभर पुरेल अशा जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.

​यंदा तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने तीव्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाई आणि शेतीचे नुकसान यामुळे शेतकरी व शेतमजूर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत धनगरवाडी व लगतच्या वाड्या-वस्त्यांमधील दुर्बल कुटुंबांसमोर सण साजरा कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला होता. या परिस्थितीची दखल घेत फिनोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाउंडेशनने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (CSR) मदतीचा हात पुढे केला.

​या उपक्रमांतर्गत फिनोलेक्सचे विभागीय प्रमुख ए.सी.एम. वैभव कुलकर्णी, ए.सी.ए. आकाश खैरे (कोल्हापूर) तसेच आजरा-गडहिंग्लज-चंदगड विभागाचे अधिकृत विक्रेते व उद्योजक सचिन शिंपी (भैय्या) यांच्या हस्ते प्रत्यक्ष गरजूंच्या दारात जाऊन या किटचे वितरण करण्यात आले.

​केवळ वस्तूवाटप न करता संकटाच्या काळात समाज तुमच्या पाठीशी आहे, असा दिलासा या उपक्रमाने दिल्याची भावना यावेळी व्यक्त झाली. "अशा सामाजिक उपक्रमांतून प्रत्यक्ष सेवा घडते आणि आत्मिक समाधान मिळते," असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले. याप्रसंगी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, जलस्रोतांचे जतन करावे आणि 'झाडे लावा, झाडे जगवा' हा संदेश जपत पर्यावरण संवर्धनात हातभार लावावा, असे आवाहनही करण्यात आले.

​संकटाच्या काळात मिळालेल्या या आधारामुळे लाभार्थी कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटले असून, परिसरामध्ये या संवेदनशील उपक्रमाचे कौतुक होत आहे.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

गडहिंग्लजचा दुष्काळी यादीत समावेश करण्यासाठी धरणे आंदोलन;
कृषी

गडहिंग्लजचा दुष्काळी यादीत समावेश करण्यासाठी धरणे आंदोलन;

शासकीय जिल्हास्तर नेटबॉल स्पर्धेत आजरा महाविद्यालयाच्या मुलींचे यश.
क्रीडा

शासकीय जिल्हास्तर नेटबॉल स्पर्धेत आजरा महाविद्यालयाच्या मुलींचे यश.

चंदगडचे प्रयोगशील शिक्षक संजय साबळे यांना राज्यस्तरीय ‘आयडॉल शिक्षक सन्मान’ जाहीर
शैक्षणिक

चंदगडचे प्रयोगशील शिक्षक संजय साबळे यांना राज्यस्तरीय ‘आयडॉल शिक्षक सन्मान’ जाहीर

मनोयात्र्यांच्या अंधकारमय जीवनात 'वसंत' फुलवणारा पेरणोलीचा अवलिया: अमित वसंत प्रभा
सामाजिक

मनोयात्र्यांच्या अंधकारमय जीवनात 'वसंत' फुलवणारा पेरणोलीचा अवलिया: अमित वसंत प्रभा

ANCHOR AD SLOT