रामतीर्थ न्यूज
newspaper ई-पेपर
search

व्यंकटराव हायस्कूलमध्ये 'वाचन प्रेरणा दिन' आणि 'जागतिक हात धुवा दिन' उत्साहात साजरा

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

व्यंकटराव हायस्कूलमध्ये 'वाचन प्रेरणा दिन' आणि 'जागतिक हात धुवा दिन' उत्साहात साजरा
“

पुस्तकांचे प्रदर्शन, लघुनाटिका व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थी प्रबोधन

आजरा : प्रतिनिधी,

येथील आजरा महाल शिक्षण मंडळ संचलित व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 'वाचन प्रेरणा दिन' तसेच 'जागतिक हात धुवा दिन' विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

​कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेचे प्राचार्य संजयकुमार पाटील व पर्यवेक्षिका व्ही. जे. शेलार यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व पूजन करून झाली.

​याप्रसंगी सहाय्यक शिक्षक आर. पी. होरटे यांनी 'वाचनाचे महत्त्व' या विषयावर विचार मांडले. "विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासात वाचनाचे स्थान अनन्यसाधारण आहे. नियमित वाचनामुळे केवळ ज्ञानात भर पडत नाही, तर विचारांना नवी चालना मिळून जीवनाला योग्य दिशा मिळते," असे प्रतिपादन त्यांनी केले. डी. आर. पाटील यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

​वाचन प्रेरणा दिनानिमित्त इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु. अनुष्का हरेर हिने शाळेच्या ग्रंथालयाला पुस्तक भेट देऊन वाचन संस्कृती वाढवण्याचा संदेश दिला. कु. कादंबरी धुरी व कु. अफिया भडगावकर यांनी डॉ. कलाम यांचे जीवनकार्य आणि वाचनाचे मोल यावर प्रभावी भाषणे केली. ग्रंथपाल टी. एम. गुरव यांनी आयोजित केलेल्या विविध पुस्तकांच्या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

​दुसऱ्या सत्रात जागतिक हात धुवा दिनाचे औचित्य साधून इयत्ता सहावी 'ब'च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित प्रबोधनपर लघुनाटिका सादर केली. तसेच आजारांपासून दूर राहण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने हात कसे धुवावेत, याचे थेट प्रात्यक्षिक करून दाखवले. या उपक्रमासाठी सौ. ए. डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

​संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता नववी 'क'च्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका श्रीमती एस. टी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन कु. तनया मिसाळ व कु. वेदिका खोराटे यांनी केले, तर यशराज पोतदार याने उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

वाचनाच्या बळावर जग जिंकण्याची क्षमता निर्माण होते : प्रा. मनोजकुमार पाटील
महाराष्ट्र

वाचनाच्या बळावर जग जिंकण्याची क्षमता निर्माण होते : प्रा. मनोजकुमार पाटील

आजऱ्यात ‘उमेद महा दांडिया २०२६’ उत्साहात संपन्न; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र

आजऱ्यात ‘उमेद महा दांडिया २०२६’ उत्साहात संपन्न; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित स्पर्धांमध्ये डॉ. झाकीर हुसेन हायस्कूलच्या यूसरा बुड्ढेखानचे घवघवीत यश; वनविभागातर्फे सत्कार
महाराष्ट्र

वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित स्पर्धांमध्ये डॉ. झाकीर हुसेन हायस्कूलच्या यूसरा बुड्ढेखानचे घवघवीत यश; वनविभागातर्फे सत्कार

वाचनातूनच व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास – प्रा. रमेश चव्हाण
महाराष्ट्र

वाचनातूनच व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास – प्रा. रमेश चव्हाण

ANCHOR AD SLOT