रामतीर्थ न्यूज
newspaper ई-पेपर
search

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा; 'वाचनध्यास' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा; 'वाचनध्यास' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
“

दिवसभर रंगला 'वाचनध्यास' उपक्रम वाचन संस्कृती रुजवण्यासाठी या दिवशी सलग वाचनाचा 'वाचनध्यास' हा विशेष उपक्रम राबवण्यात आला.

आजरा (प्रतिनिधी):

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर येथे 'वाचन प्रेरणा दिन' विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या 'वाचनध्यास' या सलग वाचन उपक्रमाला विद्यार्थी व वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

​कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटनाने झाली. हे उद्घाटन ज्येष्ठ संचालक बंडोपंत चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत यांनी उपस्थितांचे स्वागत करून डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

​दिवसभर रंगला 'वाचनध्यास' उपक्रम

वाचन संस्कृती रुजवण्यासाठी या दिवशी सलग वाचनाचा 'वाचनध्यास' हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, कन्या विद्यामंदिर, उर्दू प्राथमिक विद्यामंदिर, कुमार भवन विद्यामंदिर, पं. दीनदयाळ विद्यालय, आजरा महाविद्यालय, ग्रंथालयाच्या अभ्यासिकेचे विद्यार्थी, वाचक व सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमासाठी निसार लाडजी, रिजवान माणगावकर, शुभांगी पेडणेकर, संतोषी कुंभार, शुभांगी निर्मळे, संतोष लाड, दयानंद भंडारी आणि अश्विनी परीट यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

​संगणक संचाचे पूजन

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कलकत्ता यांच्याकडून वाचनालयाला भेट म्हणून मिळालेल्या नवीन संगणक संच व प्रिंटरचे पूजन संस्थेच्या उपाध्यक्षा विद्या हरेर यांच्या हस्ते करण्यात आले.

​या कार्यक्रमास वाचनालयाचे ज्येष्ठ सभासद सुरेश पत्की, शिवाजीराव पाटील, सहकार्यवाह रवींद्र हुक्केरी, संचालक विजय राजोपाध्ये, सुभाष विभुते, महंमदअली मुजावर, विनायक आमणगी, सुचेता गडडी, शुभांगी सोनुले, सदिच्छा चौगुले, सानिका गुंजाळ, सविता वायल, समीक्षा वाक्कर, दीपा कानडे, सानिया काकतीकर आदी उपस्थित होते.

​कार्यक्रमाचे नेटके संयोजन ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, निखिल कळेकर व महादेव पाटील यांनी केले, तर शेवटी वाचनालयाचे कार्यवाह कुंडलिक नावलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

पैशांचे पाकीट परत करून शाळकरी विद्यार्थ्यांनी जपला प्रामाणिकपणा; आजऱ्यात संदेश आणि नैतिकचे कौतुक
सामाजिक

पैशांचे पाकीट परत करून शाळकरी विद्यार्थ्यांनी जपला प्रामाणिकपणा; आजऱ्यात संदेश आणि नैतिकचे कौतुक

वाचनाच्या बळावर जग जिंकण्याची क्षमता निर्माण होते : प्रा. मनोजकुमार पाटील
महाराष्ट्र

वाचनाच्या बळावर जग जिंकण्याची क्षमता निर्माण होते : प्रा. मनोजकुमार पाटील

व्यंकटराव शिक्षण संकुलात 'शाही दसरा महोत्सव' व पारंपरिक वेशभूषा स्पर्धा उत्साहात संपन्न
शैक्षणिक

व्यंकटराव शिक्षण संकुलात 'शाही दसरा महोत्सव' व पारंपरिक वेशभूषा स्पर्धा उत्साहात संपन्न

आजऱ्यात ‘उमेद महा दांडिया २०२६’ उत्साहात संपन्न; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र

आजऱ्यात ‘उमेद महा दांडिया २०२६’ उत्साहात संपन्न; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ANCHOR AD SLOT