रामतीर्थ न्यूज
newspaper ई-पेपर
search

आजरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय रिले स्पर्धेत यश

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

आजरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय रिले स्पर्धेत यश
“

४ × १०० मीटर रिले स्पर्धेत पटकावला द्वितीय क्रमांक; सर्व स्तरातून कौतुक

आजरा (प्रतिनिधी):

येथील नामांकित आजरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी बजावत ४ × १०० मीटर रिले स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. या घवघवीत यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

​दि. १३ व १४ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवात आजरा हायस्कूलच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. वेग, अचूक ताळमेळ आणि उत्कृष्ट सांघिक समन्वयाच्या बळावर या खेळाडूंनी उपस्थितांची मने जिंकत रिले स्पर्धेत द्वितीय स्थान प्राप्त केले. या संघामध्ये उत्कर्ष उमेश जाधव, नियंत अजित पोवार, आरुष नितीन कुंभार, मोहम्मद रहीम तुला आणि ऋतुराज सागर गिरी गोसावी या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

​विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक श्री. एम. एस. गोरे व श्री. एम. पी. चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या चमकदार कामगिरीबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खेळाडूंच्या या यशाबद्दल आजरा शहर व परिसरामध्ये त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

आजऱ्यात ‘उमेद महा दांडिया २०२६’ उत्साहात संपन्न; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र

आजऱ्यात ‘उमेद महा दांडिया २०२६’ उत्साहात संपन्न; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा; 'वाचनध्यास' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा; 'वाचनध्यास' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रामविकासासाठी इच्छाशक्ती आणि लोकसहभाग महत्त्वाचा : भास्कर पेरे-पाटील यांचे आजऱ्यात प्रतिपादन
महाराष्ट्र

ग्रामविकासासाठी इच्छाशक्ती आणि लोकसहभाग महत्त्वाचा : भास्कर पेरे-पाटील यांचे आजऱ्यात प्रतिपादन

वाचनातूनच व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास – प्रा. रमेश चव्हाण
महाराष्ट्र

वाचनातूनच व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास – प्रा. रमेश चव्हाण

ANCHOR AD SLOT