रामतीर्थ न्यूज
newspaper ई-पेपर
search

आजऱ्यात ‘उमेद महा दांडिया २०२६’ उत्साहात संपन्न; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

आजऱ्यात ‘उमेद महा दांडिया २०२६’ उत्साहात संपन्न; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
“

नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते उद्घाटन; सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन

आजरा (प्रतिनिधी):

येथील उमेद महिला ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘उमेद महा दांडिया २०२६’ या महोत्सवाला महिलांचा प्रचंड व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नवरात्रोत्सवाच्या भक्तिमय व मंगलमय वातावरणात आजऱ्यातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून दांडिया आणि गरब्याचा आनंद लुटला. महिलांचे संघटन, सामाजिक बांधिलकी आणि गरजू महिलांना मदतीचा हात देणे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश होता.

​कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ आजऱ्याचे नगराध्यक्ष मा. अशोक अण्णा चराटी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. प्रास्ताविक करताना सौ. धनश्री मानसिंग देसाई यांनी उमेद महिला ग्रुपच्या ध्येय-धोरणांची मांडणी केली. "महिलांनी केवळ सण-उत्सवांपुरते मर्यादित न राहता सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे. समाजातील कोणतीही भगिनी अडचणीत असल्यास तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी हा ग्रुप कटिबद्ध आहे," असे सांगत त्यांनी जास्तीत जास्त महिलांनी ग्रुपशी जोडले जावे, असे आवाहन केले.

​या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष मा. अशोक अण्णा चराटी, श्री. योगेश पाटील, डॉ. स्मिता कुंभार, मा. निशा चांद, मा. सुरेखा भालेराव, मा. नूरजाहा सोलापूरे, मा. श्रद्धा विक्रम देसाई, मा. राजश्री पाटील, मा. मुग्धा चराटी, सौ. राजलक्ष्मी देसाई, सौ. अनुसया संभाजी पाटील तसेच मा. ज्योत्स्ना चराटी आदी मान्यवर उपस्थित होते.

​महिलांच्या एकजुटीतूनच समाजोपयोगी कार्याला नवी दिशा मिळते. भविष्यात गरजू महिलांना मदत, सामाजिक प्रबोधन आणि महिला सक्षमीकरणासाठी विविध व्यासपीठे उपलब्ध करून देण्याचा संकल्प उमेद महिला ग्रुपच्या आयोजक गीताताई पोतदार व भैरवी सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

​कार्यक्रमादरम्यान सौ. रचना होलम यांनी आपले मनोगत व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल आजरा पोलीस ठाणे आणि आजरा हायस्कूल प्रशासनाचे सौ. माधुरी अशोक पाचवडेकर यांनी आभार मानले.

​कार्यक्रमाचे नेटके आणि बहारदार सूत्रसंचालन प्रसिद्ध सिने अभिनेते मा. अमोल देसाई यांनी आपल्या खुमासदार शैलीत केले. सांस्कृतिक जल्लोषासोबतच सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा सोहळा आजरा परिसरातील महिलांसाठी अविस्मरणीय ठरला

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा; 'वाचनध्यास' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा; 'वाचनध्यास' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रामविकासासाठी इच्छाशक्ती आणि लोकसहभाग महत्त्वाचा : भास्कर पेरे-पाटील यांचे आजऱ्यात प्रतिपादन
महाराष्ट्र

ग्रामविकासासाठी इच्छाशक्ती आणि लोकसहभाग महत्त्वाचा : भास्कर पेरे-पाटील यांचे आजऱ्यात प्रतिपादन

वाचनातूनच व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास – प्रा. रमेश चव्हाण
महाराष्ट्र

वाचनातूनच व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास – प्रा. रमेश चव्हाण

वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित स्पर्धांमध्ये डॉ. झाकीर हुसेन हायस्कूलच्या यूसरा बुड्ढेखानचे घवघवीत यश; वनविभागातर्फे सत्कार
महाराष्ट्र

वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित स्पर्धांमध्ये डॉ. झाकीर हुसेन हायस्कूलच्या यूसरा बुड्ढेखानचे घवघवीत यश; वनविभागातर्फे सत्कार

ANCHOR AD SLOT