रामतीर्थ न्यूज
newspaper ई-पेपर
search

आरदाळ येथे ८ नोव्हेंबरला भव्य पुस्तक प्रकाशन सोहळा

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

आरदाळ येथे ८ नोव्हेंबरला भव्य पुस्तक प्रकाशन सोहळा
“

बालचमूच्या काव्यकळ्या’, ‘माता, माती आणि भक्ती’ व ‘विचारमाला’ पुस्तकांचे होणार प्रकाशन; ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार

आरदाळ (विशेष प्रतिनिधी) :

माध्यमिक विद्यालय आरदाळ व साहित्य संवाद परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक ८ नोव्हेंबर २०२६ रोजी आरदाळ येथे भव्य पुस्तक प्रकाशन सोहळा आणि कै. श्री. सुभाष रामचंद्र चव्हाण स्मृती ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत भैरीदेव मंदिर सभागृह, आरदाळ येथे पार पडणार आहे.

​विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्यात वाचन-लेखनाची आवड निर्माण व्हावी तसेच साहित्यिक अभिरुची रुजावी, या उद्देशाने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात माध्यमिक विद्यालय आरदाळच्या विद्यार्थ्यांनी स्वतः रचलेल्या कवितांचा संग्रह ‘बालचमूच्या काव्यकळ्या’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. त्याचबरोबर शिक्षक व लेखक किरण सुभाष चव्हाण लिखित ‘माता, माती आणि भक्ती’ व ‘विचारमाला’ या दोन पुस्तकांचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येईल.

​या साहित्यिक सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे सर तसेच पुणे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण उपसंचालक डॉ. एकनाथ आंबोकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू शिक्षण मंडळ, आरदाळचे अध्यक्ष श्री. हरीभाऊ कुंडलकर असणार आहेत.

​याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष श्री. शिवाजीराव पन्हाळकर, साहित्यिक व सचिव श्री. सदानंद पुंडपाळ, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत श्री. बी. एम. हिर्डेकर तसेच जिल्हा परिषद कोल्हापूरचे विस्तार अधिकारी श्री. विश्वास सुतार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

​कार्यक्रमादरम्यान कै. श्री. सुभाष रामचंद्र चव्हाण स्मृती ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शरद पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ व साहित्य संवाद परिवाराचे सदस्य परिश्रम घेत आहेत.

​या वैशिष्ट्यपूर्ण साहित्यिक मेळाव्यास साहित्यप्रेमी, पालक, माजी विद्यार्थी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

भीमाशंकर परिसरातील वृक्षतोड तत्काळ थांबवा; आजऱ्यात वृक्षप्रेमी समूहाचे तहसीलदारांना निवेदन
देश

भीमाशंकर परिसरातील वृक्षतोड तत्काळ थांबवा; आजऱ्यात वृक्षप्रेमी समूहाचे तहसीलदारांना निवेदन

डॉ. अनिल देशपांडे यांना राज्यस्तरीय 'आयएमए प्रेसिडेंट ॲप्रिसिएशन ॲवॉर्ड' जाहीर
देश

डॉ. अनिल देशपांडे यांना राज्यस्तरीय 'आयएमए प्रेसिडेंट ॲप्रिसिएशन ॲवॉर्ड' जाहीर

मराठी रंगभूमीचा समृद्ध वारसा जतन करणे गरजेचे – प्रा. विनायक चव्हाण
सांस्कृतिक

मराठी रंगभूमीचा समृद्ध वारसा जतन करणे गरजेचे – प्रा. विनायक चव्हाण

वेल्डिंगच्या ठिणग्यांतून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे शिल्पकार विजयकुमार मंगल सर
शैक्षणिक

वेल्डिंगच्या ठिणग्यांतून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे शिल्पकार विजयकुमार मंगल सर

ANCHOR AD SLOT