रामतीर्थ न्यूज
newspaper ई-पेपर
search

सह्याद्रीच्या रक्षणासाठी ‘पारगड ते रायगड जागरण यात्रा’

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

सह्याद्रीच्या रक्षणासाठी ‘पारगड ते रायगड जागरण यात्रा’
“

३० नोव्हेंबरपासून पारगड ते पन्हाळा पहिला टप्पा; पर्यावरण प्रेमींना सहभागी होण्याचे आवाहन

आजरा : प्रतिनिधी

कर्जत येथे भीमाशंकरच्या अभयारण्यालगत होणाऱ्या टोरंटो प्रकल्पापाठोपाठ महाराष्ट्रात प्रस्तावित असलेल्या ३० पंप स्टोरेज प्रकल्पांपैकी काही ठिकाणी स्थानिक जनतेचा विरोध डावलून जबरदस्तीने प्रकल्पांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे, तर काही प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. यातील सर्वाधिक प्रकल्प हे पश्चिम घाटात उभारले जाणार आहेत. हे संकट केवळ भीमाशंकरपुरते मर्यादित नसून थेट आपल्या दारापर्यंत येऊन ठेपले आहे.

​धामापूर (ता. चंदगड) येथे होणाऱ्या पंप स्टोरेज प्रकल्पासाठी चंदगड तालुक्यातील २९५ हेक्टर, तर आजरा तालुक्यातील १७० हेक्टर जंगलाची तोड केली जाणार आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातच असे चार प्रकल्प उभारले जाणार असून, हे सर्व प्रकल्प सह्याद्रीच्या अतिसंवेदनशील भागात येतात. या प्रकल्पांमुळे जैवविविधता आणि पर्यावरणाचे अतोनात नुकसान होणार असून, दक्षिण भारताचा मुख्य जलस्रोत असलेला संपूर्ण पश्चिम घाट उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

​सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाटाचे पर्यावरणीय महत्त्व अनन्यसाधारण आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेला हा परिसर अनेक दुर्मिळ पशू, पक्षी, प्राणी आणि वनस्पतींचा नैसर्गिक अधिवास आहे. निसर्गाला पूरक अशी जीवनशैली येथील समाजाने वर्षानुवर्षे विकसित केली आहे. पश्चिम घाटाला ज्याप्रमाणे समृद्ध पर्यावरणीय वारसा लाभला आहे, तसाच तो सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्याही संपन्न आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य याच सह्याद्रीच्या बळावर विस्तारले आणि स्वाभिमानाची नवी संस्कृती इथेच उभी राहिली. मात्र, आज नवनवे प्रकल्प सह्याद्रीच्या माथ्यावर लादून या साऱ्या निसर्गसंपदेवर वरवंटा फिरवला जात आहे. एका बाजूला कधीही भरून न येणारी पर्यावरणाची हानी होणार असून, दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास पुसण्याचा हा प्रकार सुरू आहे.

​या पार्श्वभूमीवर सह्याद्रीच्या रक्षणासाठी ‘पारगड ते रायगड जागरण यात्रा’ काढण्यात येणार आहे. ही यात्रा दीर्घकाळ चालणार असून, तिचा पहिला टप्पा ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत किल्ले पारगड ते किल्ले पन्हाळगड असा पार पडणार आहे. या मोहिमेत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील व राज्यातील सर्व पर्यावरण प्रेमी, इतिहास अभ्यासक आणि जागरूक नागरिकांनी या जागरण यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आज झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले.

​सदर पत्रकार परिषदेत निमंत्रक कॉ. संपत देसाई आणि प्रा. सुनील शिंत्रे यांनी ही माहिती दिली. यावेळी संदीप देसाई, कृष्णा भारतीय, कॉ. शांताराम पाटील, प्रकाश मोरुस्कर, युवराज पोवार, नामदेव फगरे, विजय कांबळे, नारायण भडांगे, दशरथ घुरे यांच्यासह आजरा व भुदरगड तालुक्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

आजरा रवळनाथ कॉलनी येथे ‘वाय. बी. एस.टी. स्टॉप’
सामाजिक

आजरा रवळनाथ कॉलनी येथे ‘वाय. बी. एस.टी. स्टॉप’

राधानगरीला मेडिकल व टुरिझम हब बनवणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
आरोग्य

राधानगरीला मेडिकल व टुरिझम हब बनवणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोळिंद्रे-पोश्रातवाडी येथे भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न..
महाराष्ट्र

कोळिंद्रे-पोश्रातवाडी येथे भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न..

आजरा तालुक्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शांततेत मतदान
महाराष्ट्र

आजरा तालुक्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शांततेत मतदान

ANCHOR AD SLOT