रामतीर्थ न्यूज
newspaper ई-पेपर
search

निसर्गाप्रती संवेदनशीलता! वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी घाटकरवाडीतील चिमुकल्यांचा पुढाकार

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

निसर्गाप्रती संवेदनशीलता! वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी घाटकरवाडीतील चिमुकल्यांचा पुढाकार
“

डोंगरवाडी नजीकच्या ओहळावर श्रमदानातून उभारला वनराई बंधारा; परिसरातून होतंय कौतुक

घाटकरवाडी (विशेष प्रतिनिधी):

उन्हाची चाहूल लागताच जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटू लागतात, ज्यामुळे वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मुक्या प्राण्यांची हीच अडचण ओळखून सुळेरान पैकी घाटकरवाडी येथील बाळगोपाळांनी एकत्र येत एक अनोखा व कौतुकास्पद आदर्श घालून दिला आहे. परिसरातील डोंगरवाडी नजीक असलेल्या 'वाडीचा ओहळ' येथील पाणवट्यावर मुलांनी श्रमदानातून एक वनराई बंधारा उभारून वन्यजीवांची तहान भागवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

​उपलब्ध साहित्यातून साधली किमया

​घाटकरवाडीतील पंकज पाटील, प्रभात पाटील, विशाल पाटील, सुजल पाटील, सोहम पाटील, विवेक पाटील आणि गंधर्व पाटील या शाळकरी मुलांनी एकत्र येऊन हे काम पूर्ण केले. झाडांच्या लहान फांद्या, दगड-गोटे, माती आणि सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांचा कल्पकतेने वापर करत मुलांनी वाहणारे पाणी अडवून छानसा बंधारा उभा केला.

​वनक्षेत्रपालांचे लाभले मार्गदर्शन

​चंदगडचे वनक्षेत्रपाल तथा मुलांचे काका श्री. दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलांनी हा उपक्रम हाती घेतला. या बंधाऱ्यामुळे काही दिवसांसाठी का होईना, मुक्या प्राण्यांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होणार आहे.

​या वनक्षेत्रात गवे, सांबर, भेकर, रानडुक्कर, अस्वल, बिबट्या आणि हत्ती यांसारख्या वन्यजीवांचा मोठा वावर असतो. त्यामुळे जंगलातच पाणी उपलब्ध झाल्याने वन्यजीव गावाकडे किंवा मानवी वस्तीकडे वळण्याचा धोकाही काही प्रमाणात टळू शकेल.

​भविष्यात आणखी बंधारे बांधण्याचा संकल्प

​हा उपक्रम आकाराने जरी लहान वाटत असला, तरी 'जल, जंगल आणि जमीन' वाचवण्यासाठी या मुलांनी उचललेला हा वाटा अत्यंत मोलाचा ठरत आहे. भविष्यात गावातील इतर मुले आणि ग्रामस्थांना सोबत घेऊन परिसरात आणखी वनराई बंधारे बांधण्याचा मानस या मुलांनी व्यक्त केला आहे. बालवयातच निसर्गाप्रती दाखवलेल्या या संवेदनशीलतेचे आणि समाजोपयोगी कार्याचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आवंडी धनगरवाड्यात धावली 'लालपरी'!
महाराष्ट्र

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आवंडी धनगरवाड्यात धावली 'लालपरी'!

शिक्षकांचा सन्मान माझी जबाबदारी अधिक वाढवणारा : शिक्षक आमदार कौस्तुक गावडे
महाराष्ट्र

शिक्षकांचा सन्मान माझी जबाबदारी अधिक वाढवणारा : शिक्षक आमदार कौस्तुक गावडे

पारेवाडीच्या 'श्री गणेश महिला दूध संस्थे'कडून उत्पादकांना दिवाळी गोड
महाराष्ट्र

पारेवाडीच्या 'श्री गणेश महिला दूध संस्थे'कडून उत्पादकांना दिवाळी गोड

पं. दीनदयाळ विद्यालयाच्या मीरा हरेर हिचे ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेत देदीप्यमान यश
शैक्षणिक

पं. दीनदयाळ विद्यालयाच्या मीरा हरेर हिचे ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेत देदीप्यमान यश

ANCHOR AD SLOT