सारथी महाराष्ट्राचा
newspaper ई-पेपर
search

आजरा साखर सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी महादेव सरोळकर तर व्हा. चेअरमनपदी सौ. रजनी जाधव यांची बिनविरोध निवड

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

आजरा साखर सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी महादेव सरोळकर तर व्हा. चेअरमनपदी सौ. रजनी जाधव यांची बिनविरोध निवड

​आजरा (प्रतिनिधी - गोपाळ गडकरी):

आजरा साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, गवसे या संस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच उत्साहात पार पडली. या निवडणुकीत चेअरमनपदी महादेव विठोबा सरोळकर तर व्हाईस चेअरमनपदी सौ. रजनी रवींद्र जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

​संस्थेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. येजरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड सभा पार पडली. बैठकीत चेअरमन पदासाठी महादेव सरोळकर यांचे नाव संचालक प्रशांत जाधव यांनी सुचवले, तर त्यास संचालक पांडुरंग दोरुगडे यांनी अनुमोदन दिले. तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी सौ. रजनी जाधव यांचे नाव संचालक विजय माने यांनी सुचवले आणि त्यास संचालक प्रभाकर कांबळे यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली.

​या महत्त्वपूर्ण सभेस संचालक दयानंद लोहार, सागर मांगले, कृष्णाजी कांबळे, सौ. सुरेखा भुजंग यांच्यासह संस्थेचे व्यवस्थापक संदीप पाटकर व क्लार्क दशरथ मळेकर उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन महादेव सरोळकर व व्हाईस चेअरमन सौ. रजनी जाधव यांचे सर्व संचालक मंडळ, कारखाना कर्मचारी व सभासदांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने
महाराष्ट्र

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने

तीन वर्षांत एकता गृहतारण संस्थेच्या ठेवी ४ कोटी ५२ लाखांवर आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी; लवकरच शाखाविस्तार : संस्थापक संतोष जाधव
अर्थव्यवस्था

तीन वर्षांत एकता गृहतारण संस्थेच्या ठेवी ४ कोटी ५२ लाखांवर आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी; लवकरच शाखाविस्तार : संस्थापक संतोष जाधव

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी; संचालक गोविंद पाटील यांच्या हस्ते अभिवादन
अर्थव्यवस्था

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी; संचालक गोविंद पाटील यांच्या हस्ते अभिवादन

आजरा महाविद्यालयात 'ड्रग्ज व अंमली पदार्थांचे धोके' यावर प्रबोधनपर व्याख्यान संपन्न
देश

आजरा महाविद्यालयात 'ड्रग्ज व अंमली पदार्थांचे धोके' यावर प्रबोधनपर व्याख्यान संपन्न

ANCHOR AD SLOT