सारथी महाराष्ट्राचा
newspaper ई-पेपर
search

आजरा हायस्कूलमध्ये काशिनाथ आण्णा स्मृती दिन संपन्न; अक्षरा पाटीलचे उल्लेखनीय यश.

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

आजरा हायस्कूलमध्ये काशिनाथ आण्णा स्मृती दिन संपन्न; अक्षरा पाटीलचे उल्लेखनीय यश.

आजरा, प्रतिनिधी : गोपाळ गडकरी,                                                       जनता शिक्षण संस्था संचलित आजरा हायस्कूलमध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. काशिनाथ आण्णा यांच्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक श्री. ए. आर. व्हसकोटी यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाली.

यावेळी व्ही. पी. हरेर मॅडम यांनी काशिनाथ आण्णा यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील बहुमूल्य कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याचा व विचारांचा परिचय करून दिला.

दरम्यान, आजरा महाविद्यालयात आयोजित अण्णा-भाऊ स्मृती पंधरवड्यानिमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धांमध्ये आजरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. निबंध स्पर्धेत अक्षरा सर्जेराव पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री. ए. आर. व्हसकोटी, पर्यवेक्षक श्री. एम. एस. गोरे यांचे प्रोत्साहन तसेच स्पर्धा विभागाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. एस. शेलार मॅडम यांनी केले, तर एस. एस. कुराडे मॅडम यांनी आभार मानले.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने
महाराष्ट्र

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने

तीन वर्षांत एकता गृहतारण संस्थेच्या ठेवी ४ कोटी ५२ लाखांवर आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी; लवकरच शाखाविस्तार : संस्थापक संतोष जाधव
अर्थव्यवस्था

तीन वर्षांत एकता गृहतारण संस्थेच्या ठेवी ४ कोटी ५२ लाखांवर आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी; लवकरच शाखाविस्तार : संस्थापक संतोष जाधव

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी; संचालक गोविंद पाटील यांच्या हस्ते अभिवादन
अर्थव्यवस्था

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी; संचालक गोविंद पाटील यांच्या हस्ते अभिवादन

आजरा महाविद्यालयात 'ड्रग्ज व अंमली पदार्थांचे धोके' यावर प्रबोधनपर व्याख्यान संपन्न
देश

आजरा महाविद्यालयात 'ड्रग्ज व अंमली पदार्थांचे धोके' यावर प्रबोधनपर व्याख्यान संपन्न

ANCHOR AD SLOT