रामतीर्थ न्यूज
newspaper ई-पेपर
search

स्त्रीचा सन्मान हाच खरा दुर्गापूजेचा उत्सव : संजय साबळे

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

स्त्रीचा सन्मान हाच खरा दुर्गापूजेचा उत्सव : संजय साबळे
“

कुर्तनवाडीत हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

कुर्तनवाडी :( ता. चंदगड ) प्रतिनिधी,


"मंदिरातील देवीच्या पूजेसोबतच घरातील स्त्रियांचाही सन्मान आणि आदर करणे आवश्यक आहे. स्त्रीमध्ये संकटांचा सामना करण्याची प्रचंड क्षमता असून तीच संस्कारक्षम व सुसंस्कृत पिढी घडवू शकते. त्यामुळे स्त्रीचा सन्मान करणे हीच खरी दुर्गापूजा आहे," असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते संजय साबळे यांनी केले.

​येथील श्री दुर्गादेवी उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित हळदी-कुंकू समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी स्त्रीचे कुटुंबातील स्थान, समाजाच्या जडणघडणीतील योगदान आणि स्त्रीसन्मानाचे महत्त्व यावर विचार मांडले.

​पुढे बोलताना साबळे म्हणाले की, "स्त्रीला शक्तीस्वरूप मानले जाते. नवरात्रोत्सवात आपण दुर्गादेवीची मनोभावे पूजा करतो; मात्र प्रत्यक्ष दैनंदिन जीवनातही महिलांना सन्मानाची वागणूक देणे तितकेच गरजेचे आहे. स्त्री ही कुटुंबाचा मुख्य आधार असून मुलांवर सुसंस्कार करण्यापासून ते समाजाच्या विकासात मोलाची भूमिका बजावते. त्यामुळे महिलांचा आदर करणे, त्यांना समान संधी देणे आणि त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे." स्त्रीशक्तीचा गौरव आणि सामाजिक जाणीव दृढ करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मनीषा माडखोलकर यांनी केले. याप्रसंगी अशोक चांदेकर, भिकू माडखोलकर, मालन चौकूळकर, अश्विनी चांदेकर यांच्यासह गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन दौलत चांदेकर यांनी केले, तर कांचन चांदेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

आदमापूर येथे गर्दीचा फायदा घेऊन मंगळसूत्र लांबवणारी महिला जेरबंद
महाराष्ट्र

आदमापूर येथे गर्दीचा फायदा घेऊन मंगळसूत्र लांबवणारी महिला जेरबंद

श्री कलेश्वर विद्या मंदिर वडकशिवाले येथे ‘शाही दसरा महोत्सव २०२६’ उत्साहात साजरा
शैक्षणिक

श्री कलेश्वर विद्या मंदिर वडकशिवाले येथे ‘शाही दसरा महोत्सव २०२६’ उत्साहात साजरा

माध्यमिक विद्यालय आरदाळ येथे 'शाही दसरा' व 'आनंददायी शनिवार' उपक्रम उत्साहात संपन्न
शैक्षणिक

माध्यमिक विद्यालय आरदाळ येथे 'शाही दसरा' व 'आनंददायी शनिवार' उपक्रम उत्साहात संपन्न

वाचनाच्या बळावर जग जिंकण्याची क्षमता निर्माण होते : प्रा. मनोजकुमार पाटील
महाराष्ट्र

वाचनाच्या बळावर जग जिंकण्याची क्षमता निर्माण होते : प्रा. मनोजकुमार पाटील

ANCHOR AD SLOT