रामतीर्थ न्यूज
newspaper ई-पेपर
search

आदमापूर येथे गर्दीचा फायदा घेऊन मंगळसूत्र लांबवणारी महिला जेरबंद

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

आदमापूर येथे गर्दीचा फायदा घेऊन मंगळसूत्र लांबवणारी महिला जेरबंद
“

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई, १.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर / प्रतिनिधी:

संत बाळूमामा मंदिर आदमापूर येथे दर्शनासाठी आलेल्या भाविक महिलेचे दीड लाख रुपये किमतीचे मणीमंगळसूत्र गर्दीचा फायदा घेऊन चोरणाऱ्या एका महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिये फाटा येथे सापळा रचून अटक केली. सुरेखा राजू नरदे (वय ४०, मूळ रा. केर्ली तर्फ सोनतळी, ता. करवीर, सध्या रा. टेंबलाई नाका, रेल्वे फाटक, गेट नं. २, कोल्हापूर) असे संशयित महिला आरोपीचे नाव आहे. तिच्याकडून चोरीस गेलेले मणीमंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.

​नेमकी घटना काय?

विटा (जि. सांगली) येथील रहिवासी वनिता सुरेश तावरे या १० ऑक्टोबर २०२६ रोजी आदमापूर येथे संत बाळूमामाच्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी मंदिरात झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसूत्र चोरून नेले होते. याप्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(३) प्रमाणे ११ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​गोपनीय माहितीवरून शिये फाटा येथे सापळा

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना विशेष निर्देश दिले होते. त्यानुसार सपोनि संग्राम पाटील यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली.

​तपास सुरू असतानाच पोलीस अंमलदार राजू कोरे व शुभम संकपाळ यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संबंधित गुन्ह्यातील चोरलेले दागिने विकण्यासाठी एक महिला हातकणंगले तालुक्यातील टोप गावच्या हद्दीतील शिये फाटा चौकात येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी शिये फाटा येथे सापळा लावून संशयित महिला सुरेखा नरदे हिला ताब्यात घेतले.

​गुन्ह्याची कबुली; मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने आदमापूर येथील चोरीची कबुली दिली. तिच्याकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीचे ११.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र जप्त करण्यात आले असून पुढील कारवाईसाठी तिला भुदरगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

​ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक श्री. आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सपोनि संग्राम पाटील, सागर वाघ, अंमलदार युवराज पाटील, योगेश गोसावी, समीर कांबळे, सिध्दार्थ मछले, सतिश जंगम, राजू कोरे, शुभम संकपाळ, संजय हुंबे, अमित सर्जे, सचिन पाटील, संजय देसाई, अमित मर्दाने यांच्या पथकाने केली.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

माध्यमिक विद्यालय आरदाळ येथे 'शाही दसरा' व 'आनंददायी शनिवार' उपक्रम उत्साहात संपन्न
शैक्षणिक

माध्यमिक विद्यालय आरदाळ येथे 'शाही दसरा' व 'आनंददायी शनिवार' उपक्रम उत्साहात संपन्न

स्त्रीचा सन्मान हाच खरा दुर्गापूजेचा उत्सव : संजय साबळे
मनोरंजन

स्त्रीचा सन्मान हाच खरा दुर्गापूजेचा उत्सव : संजय साबळे

वाचनातूनच व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास – प्रा. रमेश चव्हाण
महाराष्ट्र

वाचनातूनच व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास – प्रा. रमेश चव्हाण

गोकुळ दूध संघ निवडणुकीत ९९.९६% विक्रमी मतदान; उद्या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष!
महाराष्ट्र

गोकुळ दूध संघ निवडणुकीत ९९.९६% विक्रमी मतदान; उद्या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष!

ANCHOR AD SLOT