रामतीर्थ न्यूज ई-पेपर
महाराष्ट्र

व्यंकटराव हायस्कूलमध्ये तालुका विधी सेवा समिती, वकील बार असोसिएशन व शिक्षण संकुलातर्फे कायदेविषयक मार्गदर्शन संपन्न

संपादक - गोपाळ गडकरी • 31 October 2026, 02:41 PM

आजरा (प्रतिनिधी):

स्थानिक व्यंकटराव शिक्षण संकुल, वकील बार असोसिएशन आणि तालुका विधी सेवा समिती, आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने व्यंकटराव हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न झाले. हा कार्यक्रम दिवाणी न्यायाधीश आर. पी. थोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

​कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते न्यायाधीश आर. पी. थोरे व आजरा बार असोसिएशनचे अध्यक्ष अँडव्होकेट संजय पोवार यांचा सत्कार करण्यात आला.

​मार्गदर्शन करताना अँडव्होकेट संजय पोवार यांनी महिलांचे कायदे, वारसा हक्क, जमीनविषयक कायदे, शिक्षणाचा हक्क (RTE) हा मूलभूत अधिकार तसेच फौजदारी व दिवाणी कायद्यांविषयी सविस्तर माहिती दिली. यासोबतच विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून बालविवाहास ठाम विरोध करावा, असे आवाहन त्यांनी केले.

​कार्यक्रमात अँडव्होकेट सुनीता पाटील यांनी "माझे शरीर, माझी सुरक्षा" या विषयावर अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले. तर अँडव्होकेट एस. आर. चव्हाण यांनी 'पोक्सो' (POCSO) कायदा आणि 'चाइल्ड हेल्पलाइन'च्या कार्यपद्धतीविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

​याप्रसंगी आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयंतराव शिंपी, प्राचार्य एस. एन. पाटील आणि पर्यवेक्षिका व्ही. जे. शेलार व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँडव्होकेट आजगेकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डी. आर. पाटील यांनी केले.

​या कायदेविषयक शिबिरासाठी आजरा बार असोसिएशनचे सर्व अँडव्होकेट, हायस्कूलमधील शिक्षक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)