रामतीर्थ न्यूज ई-पेपर
क्रीडा

स्व. बाबुरावजी कुंभार स्मृती कबड्डी स्पर्धा: ‘शृंगार ॲग्रो’ शृंगारवाडी संघ ठरला अजिंक्य!

संपादक - गोपाळ गडकरी • 31 October 2026, 02:21 PM

आजरा / वार्ताहर,

स्व. बाबुरावजी कुंभार यांच्या १० व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भव्य कबड्डी ओपन (पुरुष गट) स्पर्धेत 'Shrings Agro, शृंगारवाडी' कबड्डी संघाने अटीतटीच्या लढतीत विजय मिळवत प्रथम क्रमांकाचा मानाचा चषक पटकावला.

​या स्पर्धेत परिसरातील तसेच विविध भागांतील नामांकित कबड्डी संघांनी सहभाग नोंदवला होता. सुरुवातीच्या फेरीपासूनच शृंगार ॲग्रो, शृंगारवाडी संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ, आक्रमक चढाया आणि मजबूत पकडींचे प्रदर्शन करत अंतिम फेरीत धडक मारली. अत्यंत चुरशीच्या आणि अंगावर शहारे आणणाऱ्या अंतिम सामन्यात शृंगारवाडीच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

​सामना संपल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला आकर्षक चषक आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. संघाच्या या दैदिप्यमान विजयाबद्दल क्रीडाप्रेमी, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून शृंगारवाडी संघातील सर्व खेळाडू व संघ व्यवस्थापनाचे मनापासून कौतुक होत आहे.

​सर्व स्तरांतून Shrings Agro, शृंगारवाडी कबड्डी संघाचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)