रामतीर्थ न्यूज ई-पेपर
शैक्षणिक

रोझरी इंग्लिश स्कूल आजरा येथे ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा; समूह वाचनातून डॉ. कलाम यांना आदरांजली

संपादक - गोपाळ गडकरी • 15 October 2026, 11:16 PM

आजरा (विशेष प्रतिनिधी):

स्थानिक रोझरी इंग्लिश स्कूल आजरा येथे भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन फादर व्हॉल्विन, विद्यालयाचे मुख्याध्यापक मनवेल बारदेसकर, पर्यवेक्षक विजय केसरकर तसेच उपस्थित सर्व शिक्षकवृंदाच्या हस्ते करण्यात आले.

​या प्रसंगी पाचवीतील विद्यार्थिनी कु. मृणालिनी पालकर व कु. साद लतिफ या विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक मनवेल बारदेसकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत डॉ. कलाम यांच्या विचारांवर प्रकाश टाकला आणि वाचनाचे जीवनातील महत्त्व विशद केले.

​वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे संयोजक श्री. आशिष फर्नांडिस यांच्या संकल्पनेतून सलग दोन तास ‘समूह वाचन उपक्रम’ राबवण्यात आला. यामध्ये सर्व शिक्षक आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत दोन तास वाचनाचा आनंद घेतला. या उपक्रमाद्वारे वाचन प्रेरणा दिनाचा प्रत्यक्ष उद्देश साध्य करत विद्यार्थ्यांनी समूह वाचनाच्या माध्यमातून डॉ. कलाम यांना अनोखी आदरांजली वाहिली.

​कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. प्रणिता होडगे यांनी केले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)