रामतीर्थ न्यूज ई-पेपर
शैक्षणिक

पं. दीनदयाळ विद्यालयाच्या मीरा हरेर हिचे ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेत देदीप्यमान यश

संपादक - गोपाळ गडकरी • 08 November 2026, 08:56 PM

आरदाळ : प्रतिनिधी,

येथील राजर्षी शाहू शिक्षण मंडळ संचलित पंडित दीनदयाळ विद्यालयाची विद्यार्थिनी कु. मीरा सुनील हरेर हिने कै. श्री. सुभाष रामचंद्र चव्हाण स्मृती ऑनलाइन राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

​शाळेत आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात कोल्हापूरचे विस्तार अधिकारी श्री. विश्वास सुतार साहेब व स्थानिक गावच्या सरपंच सौ. पाटील ताई यांच्या शुभहस्ते मीरा हिला सन्मानपूर्वक पारितोषिक प्रदान करण्यात आले.

​या कार्यक्रमास राजर्षी शाहू शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष श्री. शिवाजीराव पन्हाळकर, सचिव तथा ज्येष्ठ साहित्यिक श्री. सदानंद पुंडपळ, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, माध्यमिक विद्यालय आरदाळचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मीरा हिने मिळवलेल्या या यशाबद्दल संस्था पदाधिकारी, ग्रामस्थ व शिक्षकांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)