रामतीर्थ न्यूज ई-पेपर
महाराष्ट्र

कोळिंद्रे-पोश्रातवाडी येथे भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न..

संपादक - गोपाळ गडकरी • 08 November 2026, 11:17 AM

आजरा (प्रतिनिधी):

कोळिंद्रे-पोश्रातवाडी (ता. आजरा) येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य नागरी सत्कार सोहळा अत्यंत उत्साही व भारलेल्या वातावरणात पार पडला. या वेळी उपस्थित मान्यवरांचा ग्रामस्थांच्या वतीने स्नेहपूर्ण सत्कार करण्यात आला.

​सत्कार सोहळ्यानंतर स्थानिक नागरिक, शेतकरी बांधव, युवक आणि महिलांशी थेट व मनमोकळा संवाद साधण्यात आला. ग्रामस्थांनी गावातील विविध समस्या, दैनंदिन अडीअडचणी तसेच प्रलंबित विकासकामांचा पाढा मान्यवरांसमोर मांडला. त्यावर सकारात्मक चर्चा करून, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारी सर्व कामे प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे व प्रयत्नशील राहण्याचे ठोस आश्वासन यावेळी देण्यात आले. "ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेले प्रेम हीच आमची जनसेवेची खरी ताकद व प्रेरणा आहे," अशी भावना यावेळी व्यक्त झाली.

​या सोहळ्यास माजी राज्यमंत्री मा. भरमुअण्णा पाटील, मा. अशोकअण्णा चराटी, जयवंत सुतार, अनिकेत चराटी, समीर पारधे, संदीप चौगले, समीर देसाई, संभाजी सरदेसाई, विठ्ठलराव देसाई, सौ. वंदना सावंत, प्रकाश पाटील, सौ. दीपाली पाटील, मनोहर पाटील, सौ. मनीषा अम्रुस्कर, सी. आर. देसाई, दशरथ अमृते, निवृत्ती शेंडे, संतोष चौगुले, अशोक गडदे, विजय अम्रुस्कर, सुरेश हरेर, विजय पाटील, युवराज देसाई, रणजित परीट, विकास बागडी यांच्यासह गावातील नागरिक, युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)