रामतीर्थ न्यूज ई-पेपर
क्रीडा

आजऱ्यात स्व. बाबूरावजी कुंभार यांच्या १० व्या पुण्यस्मरणार्थ भव्य ओपन कबड्डी स्पर्धा; महिलांचा प्रदर्शनीय सामना ठरणार खास आकर्षण

संपादक - गोपाळ गडकरी • 27 October 2026, 10:23 PM

आजरा: प्रतिनिधी,

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ दिग्गज लोकनेते स्वर्गीय बाबूरावजी कुंभार यांच्या १० व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आजरा येथे पुरुषांच्या भव्य ओपन कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय, क्रीडाप्रेमी माता-भगिनींसाठी विशेष पर्वणी म्हणून प्रदर्शनीय महिला कबड्डी सामना आयोजित करण्यात आला असून हे या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असणार आहे.

​ही स्पर्धा पंडित दीनदयाळ विद्यालय, आजरा येथील पटांगणात दि. २९ व ३० ऑक्टोबर २०२६ रोजी दिवस-रात्र अशा वेळेत मातीच्या मैदानावर प्रो-कबड्डीच्या नियमांनुसार खेळवली जाणार आहे.

​आकर्षक रोख पारितोषिके व चषक:

​प्रथम क्रमांक: ₹२५,५५५/- व चषक

​द्वितीय क्रमांक: ₹१५,५५५/- व चषक

​तृतीय क्रमांक: ₹११,१११/- व चषक

​आदर्श संघ: ₹५,५५५/-

​तसेच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड यांसाठी विशेष वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेतील सर्व बक्षिसे व चषक हे डॉ. सौ. स्मिता सुधीर कुंभार (नगरसेविका, आजरा नगरपंचायत) आणि श्री. सुधीर बाबूराव कुंभार (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप कोल्हापूर व व्हा. चेअरमन, स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था, आजरा) यांच्या वतीने देण्यात येणार आहेत.

​संघांची नोंदणी व संपर्क:

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांसाठी प्रवेश फी ₹५०१/- ठेवण्यात आली असून, संघ नोंदणी बुधवार, दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १० वाजेपर्यंत करणे बंधनकारक आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी ९९२३४१९५१६, ९४२११००३८५, ९९२२४४१०६६, ९६०७५७१२७८ किंवा ९७३००८३३९२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

​तालुक्यातील व परिसरातील सर्व क्रीडारसिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन 'स्व. बाबूराव कुंभार विचार मंच, आजरा'चे सुधीर कुंभार, डॉ. स्मिता कुंभार, मलिक बुरुड आणि नाथा देसाई यांनी केले आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)