रामतीर्थ न्यूज ई-पेपर
आरोग्य

आजरा येथे ‘आयुष्य न्यूट्रिशन सेंटर’चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न

संपादक - गोपाळ गडकरी • 05 November 2026, 06:15 PM

​आजरा (प्रतिनिधी) :

‘निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती’ हा सामाजिक संदेश देत आजरा शहरात नव्याने सुरू झालेल्या ‘आयुष्य न्यूट्रिशन सेंटर’चा भव्य उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. आजरा शहर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री. महेश नार्वेकर यांच्या पत्नी सौ. सुमन नार्वेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.

​या न्यूट्रिशन सेंटरमध्ये ग्राहकांसाठी तब्बल ८१ विविध फ्लेवर्स उपलब्ध करण्यात आले आहेत. याशिवाय आजरा तालुका व परिसरातील नागरिकांसाठी मोफत ऑनलाइन व ऑफलाइन वर्कआऊट (Free Online/Offline Workout), बॉडी चेकअप, आहारविषयक सल्ले आणि संतुलित जीवनशैलीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच घरबसल्या रोजगाराच्या शोधात असणाऱ्या नागरिकांसाठी 'वर्क फ्रॉम होम' (Work From Home) संदर्भातही विशेष मार्गदर्शन या केंद्रात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

​उद्घाटनप्रसंगी आरोग्य सल्लागार परशु कोले सर, प्रिती कोले मॅडम, अमोल देसाई, रवींद्र सावंत, भास्कर बुरुड, तेजश्री बुरुड, अमोल कांबळे, प्रणाली नलावडे व दीपक कोरवी यांनी उपस्थित नागरिकांना आधुनिक धावपळीच्या युगात आहाराचे महत्त्व, योग्य पोषण आणि निरोगी जीवनशैली कशी अंगीकारावी, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

​या कार्यक्रमास सुदीप व प्रियांका नार्वेकर, सचिन व अश्विनी पोवार, प्रमोद व पूजा भुईबर, दीपाली कोरवी, नितीन व अर्चना बुरुड, अमित पाटील, सुधाकर व रेश्मा परीट, सचिन पाटील, मारुती कालेकर, बाळू शिंत्रे, रघुनाथ कातकर, सागर कुंभार, ओमकार प्रभू, पूनम देसाई, दिनकर पाटील, गणपत जाधव यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​पत्ता :

आयुष्य न्यूट्रिशन सेंटर, भारतीय स्टेट बँक (SBI) समोर, मिल्क कॉर्नर, वरचा मजला, आजरा.

​शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या केंद्राला आवर्जून भेट द्यावी आणि उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)