आजरा : प्रतिनिधी,
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आजरा तालुक्यात उत्तूर, आजरा शहर-ग्रामीण आणि मलीग्रे विभागात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दिवसभरात सर्व केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले असून, पदवीधर मतदारांच्या तुलनेत शिक्षक मतदारांनी मतदानासाठी मोठा उत्साह दाखवला. तिन्ही विभागांत शिक्षकांच्या मतदानाची टक्केवारी सरासरी ९० टक्क्यांच्या घरात पोहोचली आहे.
विभागनिहाय मतदानाची आकडेवारी:
१. उत्तूर विभाग
पदवीधर मतदारसंघ: एकूण १,१२२ मतदारांपैकी ६५४ मतदारांनी मतदान केले.
बुथ क्र. ७३४: ५६१ पैकी ३१९ मतदान
बुथ क्र. ७३५: ५६१ पैकी ३३५ मतदान
मतदानाची टक्केवारी: ५८.२९%
शिक्षक मतदारसंघ: एकूण १४५ पैकी १३२ मतदारांनी हक्क बजावला.
मतदानाची टक्केवारी: ९१.०३%
२. आजरा शहर व ग्रामीण विभाग
पदवीधर मतदारसंघ: एकूण १,४०५ मतदारांपैकी ८६२ मतदारांनी मतदान नोंदवले.
बुथ क्र. ७३०: ४९८ पैकी ३२६ मतदान
बुथ क्र. ७३१: ४४२ पैकी २९६ मतदान
बुथ क्र. ७३२: ४६५ पैकी २४० मतदान
मतदानाची टक्केवारी: ६१.३५%
शिक्षक मतदारसंघ: बुथ क्र. ३०३ वर एकूण १४५ पैकी १३४ शिक्षकांनी मतदान केले.
मतदानाची टक्केवारी: ९२.४१%
३. मलीग्रे विभाग
पदवीधर मतदारसंघ: एकूण ६८८ मतदारांपैकी ३७७ मतदारांनी मतदान केले.
मतदानाची टक्केवारी: ५४.७६%
शिक्षक मतदारसंघ: एकूण ४७ पैकी ४१ शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदानाची टक्केवारी: ८७.२३%
तिन्ही विभागांचा एकत्रित आढावा:
पदवीधर मतदारसंघ: एकूण ३,२१५ मतदारांपैकी १,८९३ मतदारांनी मतदान केले. एकूण सरासरी मतदान ५८.८८% झाले. यामध्ये आजरा शहर व ग्रामीण भागात सर्वाधिक (६१.३५%) मतदान झाले.
शिक्षक मतदारसंघ: एकूण ३३७ मतदारांपैकी ३०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात शिक्षक मतदारांची एकत्रित टक्केवारी ९१.१०% इतकी लक्षणीय राहिली. आजरा केंद्रावर सर्वाधिक ९२.४१% मतदानाची नोंद झाली.
सकाळपासूनच केंद्रांवर मतदारांची वर्दळ दिसून येत होती. प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याने सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली.