रामतीर्थ न्यूज ई-पेपर
प्रशासन

आजरा तालुका आपले सरकार सेवा केंद्र चालक संघटनेच्या अध्यक्षपदी कुमार कांबळे

संपादक - गोपाळ गडकरी • 01 November 2026, 09:35 PM

२०२६-२७ ची नूतन कार्यकारिणी जाहीर

​आजरा :

आजरा तालुका आपले सरकार सेवा केंद्र चालक संघटनेची वर्ष २०२६-२७ ची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी श्री. कुमार कांबळे यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे.

​तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय व प्रशासकीय सेवा सुरळीतपणे पुरवण्यात आपले सरकार सेवा केंद्र चालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. केंद्र चालकांच्या विविध समस्यांचे निवारण करणे आणि संघटनेच्या माध्यमातून सेवा अधिक लोकाभिमुख करणे या उद्देशाने या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

​नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

​अध्यक्ष : श्री. कुमार कांबळे

​उपाध्यक्ष : श्री. संकेत पाटील

​सेक्रेटरी (सचिव) : श्री. धीरज पाटील

​खजिनदार : श्री. शरद उंडगे

​जिल्हा प्रतिनिधी : श्री. रुपेश भोगले

​जिल्हा प्रतिनिधी : श्री. संतोष बेलवाडे

​नूतन कार्यकारिणीच्या निवडीनंतर तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)